दुबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र सलग दोन पराभवानंतर हे चित्र बदललं आहे. सेमी फायनल गाठण्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियामधील अनेक कमतरता देखील उघड झाल्या आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या पराभवानंतर निराश झाला आहे. त्यानं या कामगिरीचं विश्लेषण करताना टीमची मोठी चूक मान्य केली आहे.
विराटनं स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवानंतर सांगितलं,'हे खूप विचित्र आहे. आम्ही बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल दाखवू शकलो नाही. आम्ही जास्त रन काढले नाहीत. तसंच ते वाचवण्याची धडाडी देखील दाखवली नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट टीमकडून क्रिकेट खेळता तेव्हा फक्त फॅन्सची नाही तर अन्य खेळाडूंचीही मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षा नेहमी राहणार. आम्ही इतक्यावर्षांपासून हे सर्व अनुभवलं आहे. भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते सहन करां लागतं. तुम्ही एक टीम म्हणून खेळता तेव्हा या अपेक्षांचा दबाव जाणवत नाही. पण, मागच्या दोन मॅचमध्ये तसं झालं नाही,' हे विराटनं मान्य केलं.
T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची लाज का गेली? ही 5 कारणं ठरली गेम चेंजर
रविवारी झालेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आले. रवींद्र जडेजा 19 बॉलमध्ये 26 रनवर नाबाद राहिला, तर हार्दिकने 23 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर ईश सोढीला 2 विकेट मिळाल्या.
भारताने दिलेलं 111 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डॅरेल मिचेलने 35 बॉलमध्ये 49 रन केले, तर केन विलियमसन 33 रनवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, T20 world cup, Team india, Virat kohli