मुंबई, 3 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पहिल्या दोन मॅचमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं त्यांचा 10 विकेट्सनं पराभव केला. दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं 8 विजय मिळवला. आता तिसऱ्या मॅचमध्ये आज (बुधवारी) भारतीय क्रिकेट टीमचा अफगाणिस्तान (India vs Afghanistan) विरुद्ध सामना होणार आहे. भारतीय टीमनं पहिल्या मॅचनंतर प्लेईंग 11 मध्ये 2 बदल केले होते. आता बुधवारच्या मॅचमध्येही टीम इंडियात बदल होण्याची चिन्हं आहेत.
मॅचच्या आदल्या दिवशी मंगळवारी झालेल्या प्रॅक्टीसच्या दिवशी टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात मोठी चर्चा झालेली दिसली. सूर्या पाठदुखीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी खेळवण्यात आलेला इशान किशन (Ishan Kishan) अपयशी ठरला होता. इशान फक्त 4 रन काढून आऊट झाला. सूर्यानं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध 11 रन काढले होते.
टीम इंडियाचे बॅटर्स पहिल्या दोन मॅचमध्ये फेल झाले. त्याचबरोबर बॉलर्सनाही कमाल करता आलेली नाही. 2 मॅचमध्ये मिळून भारतीय बॉलर्सनी फक्त 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्या दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) घेतल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याचा सहावा बॉलर म्हणून वापर करण्यात आला होता. त्यानं 2 ओव्हर्समध्ये 17 रन दिले. मंगळवारच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) बॉलिंगचा सराव केला. ऑफ स्पिनर रोहितनं आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 7 वा बॉलर म्हणून रोहितचा वापर केला जाऊ शकतो.
रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कुणाचा? टीम इंडियाच्या कोचचा खुलासा
अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर
अफगाणिस्तानची टीम ग्रुप 2 मध्ये 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. त्यांनी नामिबिया आणि स्कॉटलंडचा पराभव केला आहे. तर पाकिस्तान विरुद्ध त्यांचा निसटता पराभव झाला. टीम इंडियानं ही मॅच गमावली तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच झाल्या असून या दोन्ही मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. 2010 साली 7 विकेट्सनं तर 2012 मध्ये 23 रननं टीम इंडियानं अफगाणिस्तानचा पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, T20 world cup, Team india