मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या खेळाडूनं जिंकली मनं, तुटलेल्या हातानं घेतली सहकाऱ्याची प्रॅक्टीस! VIDEO

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या खेळाडूनं जिंकली मनं, तुटलेल्या हातानं घेतली सहकाऱ्याची प्रॅक्टीस! VIDEO

न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे. (फोटो - @BLACKCAPS)

न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे. (फोटो - @BLACKCAPS)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) या दोन्ही टीमनं आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा मिळालेली संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायची नाही, या निर्धारानं या टीम मैदानात उतरणार आहेत.

दुबई, 14 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (T20 World Cup 2021 Final) आता काही तासांवर आली आहे. दुबईतील मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात ही फायनल होणार आहे. दोन्ही टीमनं आजवर एकदाही हा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा मिळालेली संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायची नाही, या निर्धारानं या टीम मैदानात उतरणार आहेत.

न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेली आहे. न्यूझीलंडला त्यांच्या टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मॅचपूर्वी धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा विकेट किपर बॅटर डेवॉन कॉनवे (Devon Conway) फायनलमधून आऊट झाला आहे. कॉनवेच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो फायनल मॅचसह त्यानंतर होणाऱ्या भारत दौऱ्यातूनही आऊट झाला आहे.

या दुखापतीनंतरही कॉनवे निराश झालेला नाही. त्यानं त्याचा त्रास विसरून सर्व लक्ष फायनलवर केंद्रीत केलं आहे. तो न्यूझीलंड टीमच्या प्रॅक्टीसमध्येही सहभागी झाला. त्यानं ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर टीम सिफर्टचा (Tim Seifert) तुटलेल्या हातानं सराव घेतला. सिफर्ट देखील कॉनवे प्रमाणे विकेट किपर-बॅटर आहे. कॉनवेच्या जागी तो फायनलमध्ये खेळेल असे संकेत न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टेड यांनी दिले आहेत.

न्यूझीलंडचं संतुलन बिघडलं

कॉनवेनं इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 38 बॉलमध्ये 46 रन काढले होते.इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी कॉनवेनं डॅरेल मिचेल (Darell Mitchell) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता. यावर्षी फॉर्मात असलेल्या कॉनवेला दुखापत झाल्यानं न्यूझीलंडला धक्का बसला आहे.

T20 World Cup Final: इंग्लंडला हरवणाऱ्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला...

First published:
top videos

    Tags: Australia, New zealand, T20 world cup