मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: न्यूझीलंडनं 6 वर्षात तिसऱ्यांदा गमावली ICC ट्रॉफी, नशिबानं आणि ऑस्ट्रेलियानं केला पराभव

T20 World Cup: न्यूझीलंडनं 6 वर्षात तिसऱ्यांदा गमावली ICC ट्रॉफी, नशिबानं आणि ऑस्ट्रेलियानं केला पराभव

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे न्यूझीलंडचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये तिसऱ्यांदा न्यूझीलंडचं स्वप्न भंग झालं आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव करत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup 2021) विजेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे न्यूझीलंडचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा फायनलमध्ये पराभव झाला आहे. न्यूझीलंडनं 2015 पासून आयसीसी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पण, त्यांचा या कालावधीमध्ये तीन वेळा फायनलमध्ये आणि एक वेळा सेमी फायनलमध्ये पराभव झाला आहे. 2015 च्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियानं पराभव केला. त्यानंतर 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडनं त्यांचा पराभव केला.  2019 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं पुन्हा एकदा न्यूझीलंडचं स्वप्न भंग केलं. त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्धारित 50 ओव्हर्स आणि सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीमचा स्कोअर बरोबर झाला होता. मात्र त्यानंतर इंग्लंडनं जास्त फोर लगावल्यानं त्यांना वर्ल्ड चॅम्पियन घोषित करण्यात आले. केन विल्यमसनच्या टीमचा नशिबानं दगा दिला. रविवारी झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले. मार्शच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नर 38 बॉलमध्ये 53 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 18 बॉलमध्ये नाबाद 28 रनवर राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टचं यशस्वी ठरला. 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन बोल्टने 2 विकेट घेतल्या. याशिवाय कोणत्याही बॉलरला विकेट मिळाली नाही. T20 World Cup 2021: 'या' 5 जणांमुळे ऑस्ट्रेलियन टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन त्याआधी न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 172 रन केले. केन विलियमसनने 48 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली. विलियमसनच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय मार्टिन गप्टीलने 28 रन केले, पण यासाठी त्याला 35 बॉल खर्च करावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडला एकदाही ऑस्ट्रेलियाला हरवण्यात आलेलं नाही. यंदाही हे रेकॉर्ड कायम राहिलं.
First published:

Tags: Australia, New zealand, T20 world cup

पुढील बातम्या