• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Final: स्पर्धेपूर्वी मिळालेल्या वागणुकीचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा इशारा

T20 World Cup Final: स्पर्धेपूर्वी मिळालेल्या वागणुकीचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा इशारा

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आमचा प्रवास आश्चर्यकारक नाही, आमची टीम ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज आहे, असा दावा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचनं (Aaron Finch) केला आहे

 • Share this:
  दुबई, 14 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आमचा प्रवास आश्चर्यकारक नाही, आमची टीम ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज आहे, असा दावा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचनं (Aaron Finch) केला आहे. ऑस्ट्रेलियाचा या वर्षी झालेल्या सर्व टी20 सीरिजमध्ये पराभव झाला होता. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरुद्धच्या सीरिजमध्ये त्यांचा पराभव केला होता. पण वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानं 6 पैकी 5 मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये त्यांची लढत न्यूझीलंडशी (Australia vs New Zealand) होणार आहे. फिंचनं फायनलच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'हे आश्चर्यकारक नाही. आम्ही ही स्पर्धा जिंकण्याची खास योजना तयार करून इथं आलो आहे. आमच्या टीममध्ये अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. अनेकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्हाला कमी लेखलं होतं. पण, आम्ही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅचवरील पकड मजबूत करणारी कामगिरी आम्ही केली आहे. आमचे खेळाडू वर्ल्ड कप फायनल जिंकण्यासाठी सज्ज आहेत.' वन-डे वर्ल्ड कप स्पर्धा 5 वेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. रविवारी हा इतिहास बदलेल असा विश्वास फिंचनं व्यक्त केला आहे. 'आम्ही काही गोष्टी आजवर साध्य केलेल्या नाहीत. पण, यंदा आम्ही फायनलमध्ये आहोत ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला इतिहास बदलण्याची एक संधी मिळाली आहे. न्यूझीलंडची टीम जबरदस्त आहे. त्यांनी गेल्या सहा वर्षात सर्व आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आम्हाला रविवारच्या मॅचची प्रतीक्षा आहे.'  असं फिंचनं स्पष्ट केलं. न्यूझीलंडच्या खेळाडूनं जिंकली मनं, तुटलेल्या हातानं घेतली सहकाऱ्याची प्रॅक्टीस! VIDEO 'त्यांना (न्यूझीलंड) कमी लेखता येणार नाही. त्यांच्याकडं क्षमता, अनुभव आणि कौशल्य आहे. त्यामुळे न्यूझीलंडची टीम फायनलला आल्यानं मला थोडंही आश्चर्य वाटलं नाही. न्यूझीलंडची टीम 'पॉवर प्ले' मध्ये चांगली कामगिरी करते, हे एक आव्हान असेल,' असे फिंच म्हणाला. त्याचबरोबर टॉसची जास्त चिंता करत नसल्याचंही त्यानं फायनलपूर्वी सांगितलं.
  Published by:News18 Desk
  First published: