कॉनवेनं इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 38 बॉलमध्ये 46 रन काढले होते.इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी कॉनवेनं डॅरेल मिचेल (Darell Mitchell) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता. यावर्षी फॉर्मात असलेल्या कॉनवेला दुखापत झाल्यानं न्यूझीलंडला धक्का बसला आहे. T20 World Cup: अंपायरच्या मदतीनंतरही पाकिस्तान अपयशी, ऑस्ट्रेलियानं केली होती घोडचूक ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी नवा चॅम्पियन मिळणार आहे.Devon Conway has been ruled out of the @T20WorldCup Final and following tour to India with a broken right hand. Conway sustained the injury when he struck his bat immediately after being dismissed in last night’s semi-final. More Info | https://t.co/LCMOTJqmqc #T20WorldCup pic.twitter.com/JIm9o6Rhxe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, New zealand, T20 world cup