• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup: अंपायरच्या मदतीनंतरही पाकिस्तान अपयशी, ऑस्ट्रेलियानं केली होती घोडचूक

T20 World Cup: अंपायरच्या मदतीनंतरही पाकिस्तान अपयशी, ऑस्ट्रेलियानं केली होती घोडचूक

ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत (Australia vs Pakistan) टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2021 Final) प्रवेश केला आहे.

  • Share this:
    दुबई, 12 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत (Australia vs Pakistan) टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2021 Final) प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये अंपायरनं केलेली मदत आणि ऑस्ट्रेलियाची घोडचूक देखील पाकिस्तानला विजयी करू शकली नाही. त्यामुळे 12 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न धुळीला मिळाले. काय घडला प्रकार? ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानच्या 177 रनचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टनला गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियानं आक्रमक खेळ थांबवला नाही. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) पाकिस्तानच्या बॉलर्सवर हल्ला चढवला होता. 11 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शादाब खानच्या बॉलिंगवर (Shadab Khan) वॉर्नर कॅच आऊट असल्याचा निर्णय अंपायरनं दिला. खरं तर त्यावेळी बॉल बॅटला लागला नव्हता. ऑस्ट्रेलियाचे 2 रिव्ह्यू बाकी होते. तरीही वॉर्नरनं रिव्ह्यू घेतला नाही. तो पॅव्हिलियनमध्ये परतला. वॉर्नरनं 30 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीनं 49 रन काढले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियानं 3 आऊट 89 रन काढले होते. त्यानंतर 11 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हा प्रकार घडला. बॉल बॅटपासून दूर असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या गौतम गंभीरनंही वॉर्नरच्या DRS न घेण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. अंपायरची मदत आणि वॉर्नरची घोडचूक याचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला नाही. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. सगळ्या मॅच जिंकले, पण Semi Final ला हरले, पाकिस्तानला धक्का देत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये रविवारी मिळणार नवा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी नवा चॅम्पियन मिळणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: