मुंबई, 16 ऑक्टोबर: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील 16 देश या स्पर्धेत उतरणार आहेत. ओमान आणि यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयनं या वर्ल्ड कपपूर्वी आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) अन्य देशातील 7 क्रिकेटपटूंनी जोरदार कामगिरी केली असून हे खेळाडू टीम इंडियाच्या मार्गातील अडथळा ठरु शकतात. आता या अडथळ्यावर मात करण्यासाठी टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) भारतीय क्रिकेटपटूंना प्रेरित करावं लागेल. कोण आहे हे 7 खेळाडू पाहूया...
लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये आहेत. केकेआरचा फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसन आयपीएल फायनलमध्ये महागडा ठरला. पण, त्यानं संपूर्ण स्पर्धेत चांगली बॉलिंग केली आहे. त्यानं 8 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 7.46 तर स्ट्राईक रेट 13.8 इतका होता.
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) : न्यूझीलंडचा आणखी एक फास्ट बॉलर ट्रेंट बोल्टनं या आयपीएलमध्ये 13 विकेट्स घेतल्या. त्याची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीम आयपीएल प्ले ऑफ (IPL 2021 Play off) पोहचू शकली नाही. बोल्टचा या स्पर्धेतील इकोनॉमी रेट 7.90 तर स्ट्राईक रेट 23.6 होता. बोल्टकडं नव्या बॉलनं विकेट घेण्याची क्षमता आहे.
राशिद खान (न्यूझीलंड) : अफगाणिस्तानची टीमही सुपर 12 मध्ये टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये आहे. या तरुण लेग स्पिनरनं आयपीएलमध्ये 18 विकेट्स घेतल्या. राशिदची हैदराबाद टीम (SRH) आयपीएलमध्ये सर्वात तळाशी होती. पण राशिदनं जोरदार खेळ केला. त्यानं 6.69 च्या इकोनॉमी रेटनं रन दिले. टी20 क्रिकेटमध्ये ही चांगली आकडेवारी मानली जाते.
चौथ्या आयपीएल विजेतेपदानंतर रिटायरमेंटबद्दल काय म्हणाला धोनी? VIDEO
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : टीम इंडिया सेमी फायनल किंवा फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकते. आरसीबीच्या मॅक्सवेलनं 43 च्या सरासरीनं 513 रन काढले. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मॅक्सवेलनं एका सिझनमध्ये 6 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही 144 होता. त्याशिवाय त्यानं 3 विकेट्सही घेतल्या आहेत.
मोईन अली (इंग्लंड) : इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीसाठी ही स्पर्धा चांगली गेली. त्यानं चॅम्पियन सीएसकेकडून खेळताना 15 मॅचमध्ये 26 च्या सरासरीनं 357 रन केले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 137 होता. त्याशिवाय त्यानं 6 विकेट्सही घेतल्या. इंग्लंडची टीम भारताच्या ग्रुपमध्ये नाही. पण, नॉक आऊटमध्ये त्याची टीम इंडियाशी लढत होऊ शकते.
ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) : सीएसकेकडून खेळणारा ड्वेन ब्राव्हो टी20 क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव बॉलर आहे. त्यानं या आयपीएलमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 7.81 तर स्ट्राईक रेट 14.4 इतका होता. त्याचबरोबर त्यानं 261 च्या स्ट्राईक रेटनं रन काढले आहेत. वेस्ट इंडिज टीमचा भारताच्या ग्रुपमध्ये समावेश नाही.
CSK चॅम्पियन होताच पोलार्डला फोन करण्यासाठी ब्राव्हो उतावीळ, म्हणाला...
एनरिक नॉर्खिया (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेच्या या फास्ट बॉलरनं दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना यूएईमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यानं 8 मॅचमध्ये 16 च्या सरासरीनं 12 विकेट्स घेतल्या. तसंच त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 6.16 इतका होता. आफ्रिकेची टीम नॉक आऊटमध्ये टीम इंडियाशी गाठ पडू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, T20 world cup, Team india