दुबई, 16 ऑक्टोबर : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल स्पर्धेचं चौथ्यांदा विजेतेपद (CSK Win IPL 2021) पटकावले आहे. दुबईमध्ये शुक्रवारी झालेल्या फायनलमध्ये सीएसकेनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) 27 रननं पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सीएसकेनं फायनलमध्येही सरस खेळ करत केकेआरला पराभूत केले. या पराभवानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या क्रिकेटमधील रिटायमेंटबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी मॅच संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात (presentation ceremony) धोनीला रिटायरमेंटबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी धोनीनं पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याबाबत सांगितलं की, ‘बरच काही बीसीसीआयवर अवलंबून आहे. कारण, 2 नव्या टीम येणार आहेत. माझ्या फ्रँचायझीला नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. मी सीएसकेकडून खेळणार की नाही हे फारसं महत्त्वाचं नाही. चेन्नईसाठी बेस्ट काय असेल ते महत्त्वाचं आहे. कोर ग्रुपनं 10 वर्ष टीमला सांभाळलं आहे. आता बेस्ट काय आहे, हे आम्हाला पाहायचं आहे.’ असं धोनीनं सांगितलं. त्याचबरोबर मी अजून सोडलेलं नाही, असंही धोनी हसत-हसत शेवटी म्हणाला.
MS (Class Act) Dhoni! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2021
The @ChennaiIPL captain lauded the @Eoin16-led @KKRiders for a fine season. 👍 👍 @msdhoni | #VIVOIPL | #CSKvKKR | #Final pic.twitter.com/OAvjEhhfoi
यापूर्वी टाकला होता गूगली धोनीनं यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या शेवटच्या लीग मॅचपूर्वी बोलतानाही रिटायरमेंटवर गूगली टाकला होता. ‘तुम्ही मला पुढील वर्षी यलो जर्सीमध्ये बघाल. पण मी सीएसकेकडून खेळेल का हे माहिती नाही. याबाबत बरीच अनिश्चिततता आहे. दोन नव्या टीम येणार आहेत. त्यामुळे रिटेनशन रुल काय आहे हे कुणालाही माहिती नाही.’ असं धोनीनं सांगितलं होतं. IPL Final 2021 : शाहरुखचे हिरो धोनीसमोर फेल! CSK चौथ्यांदा IPL Champion घरच्या प्रेक्षकांसमोर निरोप घेण्याची इच्छा धोनीनं चेन्नईमध्ये सीएसकेच्या फॅन्ससमोर रिटायरमेंट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,’ असं भावुक वक्तव्य धोनीने केलं होतं.