मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Final: CSK चॅम्पियन होताच पोलार्डला फोन करण्यासाठी ब्राव्हो उतावीळ, म्हणाला...

IPL 2021 Final: CSK चॅम्पियन होताच पोलार्डला फोन करण्यासाठी ब्राव्हो उतावीळ, म्हणाला...

सीएसकेनं (Chennai Super Kings) चौथ्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकतात ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आणि मुंबई इंडियन्सचा स्टार कायरन पोलार्डची (Kieron Pollard) आठवण झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 ऑक्टोबर:  चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल  फायनलमध्ये (IPL 2021 Final) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेचं हे चौथं आयपीएल विजतेपद आहे. यापूर्वी चेन्नईनं 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी आयपीएल प्ले ऑफ (IPL 2021 Playoff) गाठू न शकणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या टीमनं यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

सीएसकेच्या या विजयानंतर ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आणि मुंबई इंडियन्सचा स्टार कायरन पोलार्डची (Kieron Pollard) आठवण झाली आहे. 'मी माझा फोन केल्यानंतर सर्व प्रथम पोलार्डला माझ्या 16 व्या आयपीएल विजेतेपदाबद्दल सांगणार आहे. तसंच त्याला आता मला गाठवं लागेल, याची आठवण करुन देणार आहे.' असं ब्राव्होनं मॅच संपल्यानंतर बोलताना सांगितलं.

ब्राव्हो आणि पोलार्ड हे दोघंही वेस्ट इंडिजचे दिग्गज टी20 क्रिकेटपटू आहेत. जगभरातील टी20 लीगमध्ये हे दोघंही खेळतात. तसंच त्यांनी 500 पेक्षा जास्त टी20 सामने खेळले आहेत. या दोघांमध्ये टी20 विजेतेपदाबद्दल नेहमी स्पर्धा असते. या वर्षाच्या सुरुवातीला पोलार्ड यात पुढं होता.

CSK नाही तर 'या' टीमचा होता विजेतेपदावर हक्क, धोनीचं मोठं वक्तव्य

काही महिन्यांपूर्वी पोलार्डकडं 15 तर ब्राव्होकडं 14 विजेतेपद होती. सेंट किट्स टीमचा कॅप्टन असलेल्या ब्राव्होनं कॅरेबियन प्रीमियर लीाग (CPL) स्पर्धेचं विजेतेपद पटकावत पोलार्डची बरोबरी केली. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल ट्रॉफी जिंकताच त्यानं पोलार्डला मागं टाकलं आहे.

सुनील नारायणचा T20 वर्ल्ड कप टीममध्ये समावेश होणार का? वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं दिलं उत्तर

केकेआरचे ओपनर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी चेन्नईच्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. या दोघांनी 8.1 ओव्हरमध्ये 61 रनची पार्टनरशीप केली. शुभमन गिलने 51 रन आणि व्यंकटेश अय्यरने 50 रन केले. यानंतर मात्र केकेआरची बॅटिंग गडगडली. 34 रनवरच कोलकात्याने 8 विकेट गमावल्या. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जॉस हेजलवूड आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. दीपक चहर आणि ड्वॅन ब्राव्होने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

First published:

Tags: Csk, IPL 2021