Home /News /sport /

IND vs SL: श्रीलंका दौरा ‘या’ खेळाडूंसाठी महत्त्वाचा, निवड समितीला प्रभावित करण्याची शेवटची संधी

IND vs SL: श्रीलंका दौरा ‘या’ खेळाडूंसाठी महत्त्वाचा, निवड समितीला प्रभावित करण्याची शेवटची संधी

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडिया सोमवारी रवाना होणार आहे. टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) निवड समितीला प्रभावित करण्याची त्यांना हा दौरा म्हणजे शेवटची संधी आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडिया सोमवारी रवाना होणार आहे. वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं (India vs England) या टीममध्ये अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या टीममध्ये काही सिनियर खेळाडू देखील आहेत. टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) निवड समितीला प्रभावित करण्याची त्यांना हा दौरा म्हणजे शेवटची संधी आहे. भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) हा दौरा सर्वात महत्त्वाचा आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याला फक्त पहिल्या तीन सामन्यातच खेळवण्यात आले. त्यामध्ये त्याने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटनं फक्त 3 विकेट्स घेतल्या. या कारणामुळे शेवटच्या दोन मॅचमध्ये त्याच्या जागी राहुल चहरला संधी मिळाली. चहलनं शेवटच्या 15 मॅचमध्ये फक्त एकदाच 3 विकेट्स घेतल्या आहेत. स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या श्रीलंकेतील पिचवर पुन्हा फॉर्मात येण्याची चहलकडे संधी आहे. कुलदीपला 17 महिन्यानंतर संधी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) एकेकाळी टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू होता. पण, खराब फॉर्ममुळे तो गेल्या 17 महिन्यात एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळू शकलेला नाही. त्यानं शेवटची T20 मॅच जानेवारी 2020 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली होती. त्याला या आयपीएल सिझनमध्येही बेंचवर बसावलं लागलं. कुलदीपला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी या दौऱ्यात आहे. चहर-चक्रवर्तीकडंही निवड समितीचं लक्ष फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली केली. पण त्याला ती लय पुढे टिकवता आली नाही. शेवटच्या 5 मॅचमध्ये त्याला फक्त 3 विकेट्स घेता आल्या. त्यामुळे त्यानं टीममधील जागा गमावली. मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर चमकला, वेस्ट इंडिजनं केली दक्षिण आफ्रिकेची धुलाई केकेआरचा स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) श्रीलंका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करु शकतो. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याची टीममध्ये निवड झाली आहे.वरुणसाठी फिटनेस ही मोठी समस्या आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी त्याला मैदानातील कामगिरीबरोबरच फिटनेसकडंही लक्ष देणे भाग आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, Kuldeep yadav, Team india, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या