Home /News /sport /

मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर चमकला, वेस्ट इंडिजनं केली दक्षिण आफ्रिकेची धुलाई

मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर चमकला, वेस्ट इंडिजनं केली दक्षिण आफ्रिकेची धुलाई

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (West Indies vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना शनिवारी रात्री झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजनं 8 विकेट्सनं मोठा विजय मिळवला.

    मुंबई, 27 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (West Indies vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना शनिवारी रात्री झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजनं 8 विकेट्सनं मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 160 रनचं आव्हान वेस्ट इंडिजनं 15 व्या ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. टी20 चॅम्पियन असलेल्या या टीमनं हा सहज विजय मिळवत आगामी वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) पूर्वी प्रतिस्पर्धी टीमना धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी ओपनर इविन लुईस (Evin Lewis) या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने फक्त 35 बॉलमध्ये 202 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 71 रन काढले. यामध्ये 4 फोर आणि 7 सिक्सचा समावेश आहे. लुईसनं सुरुवातीलच दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सची धुलाई केल्यानं अन्य बॅट्समनचे काम सोपे झाले. सहा वर्षांनी दिग्गज एकत्र शनिवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचे चार दिग्गज तब्बल 6 वर्षांनी एकत्र टी 20 मॅच खेळले. ख्रिस गेल (Chirs Gayle), कायरन पोलार्ड (Kieron Pollard), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) हे चार दिग्गज खेळाडू सहा वर्षांनी एकत्र वेस्ट इंडिजसाठी खेळले. यापूर्वी 2015 साली हे सर्व जण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच एकत्र टी 20 सामना खेळले होते. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गेलनं नाबाद 32 तर रसेलनं नाबाद 23 रन काढत वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारत-इंग्लंड यांची पहिली वन-डे आज, 'लेडी सेहवाग'वर टीम इंडियाची भिस्त त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 6 आऊट 160 पर्यंत मजल मारली. आफ्रिकेकडून वान डार दुसाननं सर्वात जास्त नाबाद 56 रन काढले. या विजयासह वेस्ट इंडिजनं टी 20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Mumbai Indians, South africa, West indies

    पुढील बातम्या