मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सचिनचा सल्ला, म्हणाला...

WTC Final : टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सचिनचा सल्ला, म्हणाला...

WTC फायनलपूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Teandulkar) News 18 शी बोलताना टीम इंडियाची संभाव्य Playing XI, इंग्लंडमधील वातावरण आणि टेस्ट चॅम्पियनशिपची पद्धत यावर सविस्तर मत व्यक्त केले आहे.

WTC फायनलपूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Teandulkar) News 18 शी बोलताना टीम इंडियाची संभाव्य Playing XI, इंग्लंडमधील वातावरण आणि टेस्ट चॅम्पियनशिपची पद्धत यावर सविस्तर मत व्यक्त केले आहे.

WTC फायनलपूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Teandulkar) News 18 शी बोलताना टीम इंडियाची संभाव्य Playing XI, इंग्लंडमधील वातावरण आणि टेस्ट चॅम्पियनशिपची पद्धत यावर सविस्तर मत व्यक्त केले आहे.

मुंबई, 17 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलकडं (WTC Final 2021) संपूर्ण टीम इंडियाचं लक्ष लागलं आहे. टेस्टमधील नंबर 1 आणि नंबर 2 टीममधील ही फायनल शुक्रवारपासून सुरु होत आहे. या फायनलपूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Teandulkar) News 18 शी बोलताना टीम इंडियाची संभाव्य Playing XI, इंग्लंडमधील वातावरण आणि टेस्ट चॅम्पियनशिपची पद्धत यावर सविस्तर मत व्यक्त केले आहे.

फायनलचा फॉर्मेट चूक

आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनिपच्या फॉर्मेटवर आणखी काम करण्याची गरज आहे, असा सल्ला सचिननं यावेळी दिला. "50 ओव्हर्सच्या किंवा 20 ओव्हर्सच्या चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही टीमबरोबर एकच लढत होते. त्यानंतर एक फायनल खेळली जाते. त्या स्पर्धेत ती पद्धत योग्य आहे. WTC मध्ये भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 4 टेस्ट खेळून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी फायनलमध्ये एकच टेस्ट खेळायची आहे, हे चूक आहे," असे सचिननं स्पष्ट केले. या चॅम्पियशिपसाठी 'बेस्ट ऑफ थ्री' चा प्रकार योग्य आहे, असं मत सचिननं व्यक्त केलं.

न्यूझीलंडसमोरही आव्हान

"इंग्लंडमधील टेस्टमध्ये वातावरणाची भूमिका मोठी असते. मैदानात गवत  आणि आकाशात ढग असतील तर सुरुवातीला काळजीपूर्वक खेळणे आवश्यक आहे. एकदा सेट झाल्यानंतर वेगाने रन निघू शकतात. साऊथम्पटनच्या पिचवरही ही परिस्थिती निर्णायक ठरेल. मैदानातील बाऊन्स हा फक्त टीम इंडियासाठी नाही, तर इंग्लंडसाठी देखील अडचणीचा असेल," असे सचिनने यावेळी सांगितले.

Playing 11 मध्ये कोण खेळणार?

टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे, असे सचिनने सांगितले. " मोहम्मद शमी वेगाने बॉलिंग करतो. बुमराहची शैली एकदम वेगळी आहे. इशांतची उंची चांगली आहे. उमेश आणि सिराज देखील आहेत. हे सर्व जण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. एक पॅकेज म्हणून हे सर्व प्रभावी बॉलर्स आहेत.

WTC Final आधी रहाणे म्हणतो, 'हे खेळाडू ठरवतील विजय-पराभव'

Playing 11 बद्दलचा अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंटचा असेल. कोण कसं खेळतोय हे त्यांना चांगलं माहिती आहे. अश्विन (R. Ashwin) आणि जडेजा (Ravindra Jadeja) यांना एकत्र खेळल्याचा फायदा आहे. हे दोघे बॅटींग देखील करु शकतात. ते त्यांनी यापूर्वी अनेकदा दाखवून दिलं आहे. लोअर ऑर्डरमध्ये  चांगली पार्टरनरशिप करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे या दोघांनाही खेळवणे हा चांगला पर्याय असू शकतो." असा सल्ला सचिननं दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Sachin tendulkar, Team india