साऊथम्पटन, 16 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (World Test Championship Final) आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे, पण अजूनही भारताने आपल्या अंतिम-11 खेळाडूंबाबत निर्णय घेतलेला नाही. टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. टीम इंडियाने या सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, पण इंग्लंडमधलं हवामान आणि खेळपट्टी बघून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं रहाणे म्हणाला.
'इंग्लंडमधला मोसम अचानक बदलतो, त्यामुळे आम्ही अजूनपर्यंत कोणाला खेळवायचं, याबाबत निर्णय घेतलेला नाही. आम्ही अजून दोन सराव सत्र खेळू यानंतर खेळपट्टी बघू आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.'
अजिंक्य रहाणेने टीम निवड अजून निश्चित झाली नसल्याचं सांगितलं असलं, तरी त्याने काही संकेत दिले. साऊथम्पटनमध्ये स्लो बॉलर महत्त्वाचे ठरतील, पण बॉल स्विंग होतो, त्यामुळे बॉलरना लवकरात लवकर वातावरणाशी एकरूप व्हावं लागेल, अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.
'इंग्लंडमध्ये बॅट्समन महत्त्वाची भूमिका निभावतील, तसंच मॅचचा विजय आणि पराभव बॅट्समन ठरवतील, कारण मैदान ओलं असेल तर बॉलरना बॉलिंग करताना अडचणी येतील. आम्ही हा सामना नेहमीच्या मॅचप्रमाणेच खेळणार आहोत. न्यूझीलंड चांगली टीम आहे. आम्ही त्यांना हलक्यात घेत नाही. आम्ही खेळ एन्जॉय करू आणि प्रत्येक सत्रावर लक्ष केंद्रीत करू,' असं वक्तव्य रहाणेने केलं.
अजिंक्य रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रहाणेने भारताकडून सर्वाधिक रन केले आहेत. 17 सामन्यांमध्ये त्याला 43.80 च्या सरासरीने 1095 रन करता आल्या, यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. फायनलमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket news, Team india