Home /News /sport /

'मला 10-12 वर्ष रात्री नीट झोप लागत नव्हती' सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट

'मला 10-12 वर्ष रात्री नीट झोप लागत नव्हती' सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट

जगभरातील बॉलर्सची झोप उडवणाऱ्या सचिनला (Sachin Tendulkar) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 10 ते 12 वर्ष नीट झोप लागत नव्हती. स्वत: सचिननंच या खळबळजनक गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे.

    मुंबई, 17 मे: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानं अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. जगभरातील बॉलर्सची झोप उडवणाऱ्या सचिनला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये  10 ते 12 वर्ष नीट झोप लागत नव्हती. स्वत: सचिननंच या खळबळजनक गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे. कोरोनाच्या काळात क्रिकेटपटूंना जास्त वेळ हा बायो-बबलमध्ये घालवावा लागत आहे. या बंधनामुळे खेळाडूंच्या मनस्थितीवर होणाऱ्या परिणामाबद्दल एका कार्यक्रमात बोलताना सचिननं हा गौप्यस्फोट केला. "एखाद्या मॅचसाठी शारीरिक तयारी करण्याबरोबर मानसिक तयारी करणे देखील तितकंच आवश्यक आहे. हे मला काही काळानंतर समजले. मैदानात  प्रवेश करण्यापूर्वीच माझ्या डोक्यात मॅच सुरु होत असे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या तणावाची तीव्रता ही खूप जास्त होती.'' सचिननं पुढं सांगितलं की, " मी 10-12 वर्ष हा तणाव सहन केला. मॅचपूर्वी   कित्येक रात्र नीट झोपू शकलो नाही. त्यानंतर मी या गोष्टी मान्य करण्यास सुरुवात केली.  माझी मनस्थिती नीट राहावी म्हणून मी काही वेगळ्या गोष्टी करु लागलो. यामध्ये टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम्स खेळणे तसेच सकाळी चहा बनवणे या गोष्टींचा समावेश होता.या कामांमुळे मला मॅचसाठी तयार होण्यास मदत मिळत होती. मला भावानं हे सर्व शिकवलं होतं. मी मॅचच्या एक दिवस आधीच माझी बॅग तयार करत असे. त्यानंतर मला ती सवय लागली. मी शेवटची मॅच खेळलो तेव्हा देखील हेच केलं होतं." MI vs CSK मॅच ठरली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर, मिळाले तब्बल इतके Views! दोसा देणाऱ्या कर्मचाऱ्यानं दिला सल्ला सचिननं पुढं सांगितलं की,  "प्रत्येक खेळाडूला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यानं ती परिस्थिती मान्य करणे आवश्यक आहे. तुम्ही जखमी असता तेव्हा डॉक्टर किंवा फिजिओ तुमच्यावर उपचार करतात. मानसिक आरोग्याचं देखील तसंच आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी चांगला आणि वाईट प्रसंग ही सामान्य बाब आहे. तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करता येईल." 'मी नेहमी खेळू शकत नाही म्हणून...' मोहम्मद शमीनं सांगितली 'मन की बात' सचिननं यावेळी चेन्नईतील एका हॉटेल कर्मचाऱ्याचा उल्लेख केला. "माझ्या खोलीत एक कर्मचारी दोसा घेऊन आला होता. त्यानं दोसा टेबलवर ठेवल्यानंतर मला एक सल्ला दिला. मला एल्बोमुळे बॅटचा वापर नीट करता येत नाही, असं त्यानं सांगितलं, जे खरं होतं.  त्यानंतर मला त्या समस्येवरील उपाय शोधण्यास मदत झाली." असं सचिननं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Sachin tendulkar

    पुढील बातम्या