IPL 2021: MI vs CSK मॅच ठरली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर, मिळाले तब्बल इतके Views!

IPL 2021: MI vs CSK मॅच ठरली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर, मिळाले तब्बल इतके Views!

या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही मॅच ब्लॉकबस्टर ठरली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) 29 मॅचनंतरच स्थगित करावे लागले. यामधील काही मॅच या शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झाल्या. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही आयपीएल स्पर्धा स्टेडियममध्ये पाहण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व सामने घरात बसून पाहणे हा एकच पर्याय क्रिकेट फॅन्ससमोर होता. या सिझनमध्ये देखील आयपीएलनं टीव्ही प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत (Viewership)  नव्या विक्रमाची नोंद केली आहे. या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही मॅच ब्लॉकबस्टर ठरली आहे.

बार्कनं (BARC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई विरुद्ध चेन्नई ही आयपीएलच्या पूर्वार्धात (mid season) आजवर  सर्वात जास्त पाहिली गेलेली मॅच ठरली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेली ही मॅच अखेरपर्यंत रंगली. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचमध्ये तीन्ही रिझल्ट शक्य होते. 'हॉटस्टार' मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुार या मॅचला  11.2 अब्ज मिनिट Views मिळाले असून हा एक रेकॉर्ड आहे. याचबरोबर आयपीएल 2021 मधील क्रिकेट सामन्यांचा रिच 367 मिलियन नोंदवला गेला आहे. गेल्या सिझनमध्ये हा रिच 357 मिलियन होता.

पोलार्डच्या वादळाचा मुंबईला तडाखा

मुंबई इंडियन्सला या मॅचमध्ये विजयासाठी 219 रनची आवश्यकता होती. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) वादळी खेळीमुळे मुंबईनं हे आव्हान 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईचा आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात यशस्वी पाठलाग होता. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255.88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली.

यापूर्वी अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याची वादळी खेळी आणि फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis), मोईन अलीच्या (Moeen Ali) अर्धशतकामुळे चेन्नईने मुंबईला (CSK vs MI) विजयासाठी 219 रनचं आव्हान दिलं होतं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून चेन्नईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 218  एवढा स्कोअर केला. अखेर पोलार्डच्या वादळी खेळीपुढं हा स्कोअर देखील चेन्नईसाठी अपुराच ठरला.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 2:06 PM IST

ताज्या बातम्या