मुंबई, 16 मे : टीम इंडिया पुढच्या महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या टीमचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा सदस्य आहे. टीम इंडियातील ज्येष्ठ खेळाडूंमध्ये शमीचा समावेश होतो. या अनुभवी फास्ट बॉलरकडून आगामी दौऱ्यातही भारतीय फॅन्सना मोठी अपेक्षा आहे. शमीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या आजवर कारकिर्दीमधील अनुभव सांगितले आहेत.
शमीनं गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, "इतके वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर तरुण खेळाडूंना हवं असलेलं कोणतंही इनपूट देण्यास तयार आहे. मी नेहमी खेळू शकणार नाही,त्यामुळे तरुण खेळाडूंना मदत करु शकलो तर चांगलंच होईल." भारतीय क्रिकेट टीमनं गेल्या सहा महिन्यात जबरदस्त खेळ केला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 नं पराभूत केलं. त्यानंतर मायदेशात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-1 नं पराभव केला. आगामी इंग्लंड दौऱ्यात देखील टीम इंडिया यशस्वी होईल असा विश्वास शमीनं व्यक्त केला.
"आम्ही मागच्या काही दिवसात चांगला खेळ केला आहे. त्यामुळे इंग्लंडला जाण्यापूर्वी आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आम्ही मागच्या सहा महिन्यातील खेळाची पुनरावृत्ती करु शकलो तर हा सिझन देखील चांगला ठरेल, असं शमीनं सांगितलं."
मराठी अभिनेत्रीसोबत Affair असल्याच्या चर्चेवर ऋतुराजनं सोडलं मौन, म्हणाला...
कोरोना व्हायरसमुळे बदललेल्या परिस्थितीनंतर लांबचा विचार करत नाही. एकावेळी फक्त एकाच मालिकेचा विचार करत असल्याचं शमीनं यावेळी सांगितलं. " खूप लांबची योजना तयार करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्ष वाया जातील, याचा विचार कुणी केला होता का? मी आता एकावेळी फक्त एकाच मालिकेचा विचार करतो," या शब्दात शमीनं त्याच्या मनातील भावना बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Team india