Home /News /sport /

विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला....

विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला....

विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्याने हे पद सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. विराटच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला आहे.

  मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्याने हे पद सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. विराटच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला आहे. या यादीत रोहित शर्माचा (Rohit Sharma) देखील समावेश आहे. रोहितची दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली होती. पण, तो दुखापतीमुळे या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. आता विराटने कॅप्टनपद सोडल्यानंतर या पदासाठी रोहितचं नावं सर्वात आघाडीवर आहे. रोहितनं इन्स्टाग्रामवर याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. 'धक्कादायक. पण, भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून यशस्वी कारकिर्दीसाठी अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' अशी प्रतिक्रिया रोहितने दिली असून त्या पोस्टमध्ये त्याने विराटला टॅग केले आहे.
  रोहित होणार पुढील कॅप्टन! टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराटने कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माला या फॉरमॅटची कॅप्टन्सी देण्यात आली. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहितलाच कर्णधार करण्यात आलं. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याची टेस्ट टीम निवडताना अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) उपकर्णधारपद हटवून रोहितला देण्यात आलं. 8 डिसेंबर 2021 ला ही घोषणा करण्यात आली होती. त्याचवेळी म्हणजेच दीड महिन्याआधीच विराटचा उत्तराधिकारी कोण, याचा निर्णय बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीने घेतला होता, असे मानले जात आहे. ...म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर राहुल उपकर्णधार असल्यामुळे त्यालाच या टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण आता विराटनं या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Virat kohli

  पुढील बातम्या