जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा

...म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा

...म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा

विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमची कॅप्टनसी का सोडली यााबबत सध्या चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या निर्णयाचे कारण सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमची कॅप्टनसी का सोडली यााबबत सध्या चर्चा सुरू आहे. विराटचा या प्रकारातील कॅप्टन म्हणून रेकॉर्ड सर्वात सरस आहे. भारतीय टीम तयार करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. त्याचबरोबर त्याचे टेस्ट क्रिकेटवरील प्रेम जगजाहीर आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि सध्या भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावसकरांना (Sunil Gavaskar) या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. गावसरकर यांनी ‘इंडिया टुडे’ सोबत बोलताना विराटने कॅप्टनसी का सोडली याचे कारण सांगितले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्यी टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आपल्याला कॅप्टनपदावरून काढतील, असं विराटला वाटत होतं, असा खळबळजनक दावा गावसकर यांनी केला आहे. ‘मला या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. आफ्रिका विरुद्ध झालेल्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतच तो कॅप्टनपद सोडण्याची घोषणा करेल, असं मला वाटलं होतं. तसं केलं असतं तर हा निर्णय रागात घेतला असे वाटले असते, म्हणून कदाचित तो 24 तास थांबला असावा.’ असे मत गावसकरांनी व्यक्त केले आहे. विराट कोहलीची यापूर्वी वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यातील मतभेद उघड झाले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांचे दावे फेटाळले. लिमिटेड ओव्हरमध्ये एकच कॅप्टन असावा म्हणून विराटला वगळल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केले होते. विराट कोहलीनं 24 तास आधीच दिली होती टीममधील सहकाऱ्यांना कल्पना, वाचा Inside Story गांगुलीचे स्पष्टीकरण दरम्यान, विराटनं टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडल्याचा निर्णय स्वत: घेतला आहे, त्यामध्ये बीसीसीआयचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुली यांनी दिली आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं तीन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी केली. हा विराटचा वैयक्तिक निर्णय आहे. बीसीसीआयला या निर्णयाचा आदर आहे. भविष्यात टीमला नव्या उंचीवर नेणाऱ्या टीममधील विराट महत्त्वाचा सदस्य असेल. तो एक दमदार खेळाडू आहे, असे ट्विट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात