मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही', रविंद्र जडेजानं सांगितला भीतीदायक अनुभव

'ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही', रविंद्र जडेजानं सांगितला भीतीदायक अनुभव

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात त्रासदायक आठवणी सांगितल्या आहेत.

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात त्रासदायक आठवणी सांगितल्या आहेत.

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात त्रासदायक आठवणी सांगितल्या आहेत.

मुंबई, 30 मे: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. 2018 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी जडेजा बराच काळ भारतीय टेस्ट आणि वन-डे टीममधून बाहेर होता. त्या घटनेनं जडेजाची क्रिकेट कारकिर्द बदलली. आता जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2021) जिंकण्यासाठी उत्सुक आहे. तीन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या मोजक्या खेळाडूमध्ये त्याचा समावेश होतो. नुकत्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) त्याने जबरदस्त खेळ करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.

दीड वर्ष नीट झोपलो नाही

जडेजानं 'इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील अनेक विषयांवर सविस्तर उत्तरं दिली आहेत. 'तू 18 महिने वन-डे आणि टेस्ट टीमच्या बाहेर होतास. त्यानंतर जोरदार पुनरागमन कसं केलंस?' या प्रश्नाचं उत्तर देताना जडेजा म्हणाला की, 'खरं सांगायचं तर ते दीड वर्ष माझी झोप उडाली होती. त्या काळात मी पहाटे 4-5 वाजताच उठत असे. मी पुनरागमन कसं करणार ? याचाच विचार करत होतो. मला अंथरुणावर पडलो तरी झोप लागत नव्हती. मी टेस्ट टीममध्ये होतो, पण खेळत नव्हतो.  मी वन-डे खेळत नव्हतो. मी देशांतर्गत क्रिकेट देखील खेळत नव्हतो. मी टीम इंडियासोबत प्रवास करत होतो. मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत नव्हती. मी पुनरागमन कसं करणार ? याचाच विचार करत असे.'

ऋषभ पंतचा खतरनाक स्टंट पाहून व्हाल थक्क! VIDEO VIRAL

ओव्हल टेस्टनंतर बदलला खेळ

इंग्लंडमध्ये 2018 साली ओव्हलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये 332 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 6 आऊट 160 झाली होती. त्या मॅचमध्ये जडेजानं झुंजार खेळ करत 86 रन काढले. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील त्या खेळीची प्रशंसा केली होती. जडेजाने त्या खेळीची आठवण सांगितली आहे.

'त्या टेस्टनंतर माझ्यासाठी सर्व काही बदललं. माझा खेळ, माझा आत्मविश्वास, सर्व काही. सर्वश्रेष्ठ इंग्लंड बॉलर्ससमोर रन काढल्यानंतर आत्मविश्वासात भर पडते. तुमचे तंत्र जगात कुठेही खेळण्यासाठी योग्य आहे, याची जाणीव होते. काही दिवसांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जखमी झाल्यानंतर मी वन-डे टीममध्ये पुनरागमन केले. तेव्हापासून माझा खेळ चांगला होत आहे.

भुवनेश्वर कुमारच्या आईची तब्येत गंभीर, काही दिवसांपूर्वीच झालंय वडिलांचं निधन

मला आठवतंय मी त्या टेस्टमध्ये (ओव्हल टेस्ट, 2018) बॅटींगसाठी उतरलो त्यावेळी माझ्या मनात कोणतीही योजना नव्हती. मी माझा वेळ घेतला. त्या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीला (Hanuma Vihari) देखील मी हेच सांगितले होते,' असे जडेजाने स्पष्ट केले.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Ravindra jadeja, Team india