मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ऋषभ पंतचा खतरनाक स्टंट पाहून व्हाल थक्क! VIDEO VIRAL

ऋषभ पंतचा खतरनाक स्टंट पाहून व्हाल थक्क! VIDEO VIRAL

टीम इंडिया 2 जून रोजी ब्रिटनला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाणारे सर्व सदस्य सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसवर पूर्ण फोकस करत आहे.

मुंबई, 30 मे: भारतीय क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC Final 2021) तयारी करत आहे. आयसीसी स्पर्धेची ही फायनल 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. यासाठी टीम इंडिया 2 जून रोजी ब्रिटनला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाणारे सर्व सदस्य सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसवर पूर्ण फोकस करत आहे.

ऋषभ पंत जिममध्ये व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला आहे. यामध्ये तो टीम इंडियाचे परफॉर्मर एनालिस्ट हरीप्रसाद मोहन (Hariprasad Mohan) यांना गोल फिरवत आहे. पंत आणि मोहन यांच्यात सुरु असलेल्या धमाल मस्तीचा हा व्हिडीओ फॅन्समध्ये लोकप्रिय झाला आहे.

ऋषभ पंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

ऋषभ पंतसाठी मागील सहा महिने खूप चांगले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 274 रन काढले. यामध्ये ब्रिस्बेन टेस्टमधील 89 रनचा समावेश आहे. पंतच्या या खेळीमुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकता आली. त्यानंतर भारतामध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत 270 रन काढले होते.

मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर, पत्नी निर्मलबाबत हॉस्पिटलनं दिलं अपडेट

त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेच्यापूर्वी (IPL 2021) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाल्याने त्याने दिल्ली कॅपिटल्सचं (DC)  प्रभावी नेतृत्त्व केले.  आता आगामी इंग्लंड दौऱ्यातही त्याच्याकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत.

First published:

Tags: Cricket, Rishabh pant, Sports, Video viral, Video Viral On Social Media