मुंबई, 18 ऑक्टोबर : सध्या सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेपद राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम कसून तयारी करत आहे. त्यांच्या या तयारीला पहिल्या वॉर्म-अप मॅचमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर मोठा धक्का बसलाय. वर्ल्ड कपच्या धामधुमीतच क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या वन-डे टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वॉर्नरला धक्का माजी कॅप्टन आरोन फिंचनं 50 ओव्हरच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.. त्यानंतर कमिन्स याची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, तो ऑस्ट्रेलियाचा 27 वा वन-डे कॅप्टन असेल. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया पुढील वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे. कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचं नेतृत्वही आहे. दरम्यान, दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरनं वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. विराटसोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियात फोटो Viral फिंचच्या निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे कॅप्टनपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, वॉर्नर या शर्यतीतून बाहेर होता, कारण त्याच्या कॅप्टनशीपवर आजीवन बंदी अद्याप कायम आहे. वॉर्नरला कॅप्टन बनवण्यासाठी आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला त्यांची गाइडलाइन्स बदलावी लागली असती. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं तसं न करता कमिन्स याची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचं नेतृत्व करणारा कमिन्स हा पहिला फास्ट बॉलर ठरणार आहे. बॉलर्समध्ये आतापर्यंत केवळ दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळली आहे. 1990 च्या दशकात त्याने 11 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्यानं केला खुलासा कमिन्स टेस्ट टीमचाही कॅप्टन डिसेंबर 2021 मध्ये अॅशेस सीरिजपूर्वी कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमची जबाबदारी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन टीम पेन याला एक वादामुळे कॅप्टनपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर कमिन्सची कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. 11 वर्षांपासून ऑस्ट्रेलियनं क्रिकेट टीमचा महत्त्वाचा सदस्य असलेला कमिन्स हा टेस्ट, वन डे व टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये कांगारू टीमचा मुख्य बॉलर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियनं टीमनं अॅशेस सीरिज 3-0 अशी जिंकण्यात यश मिळवलं. त्यानंतर पाकिस्तानचाही 1-0 असा पराभव केला. . मात्र, ऑस्ट्रेलियनं टीमची श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सीरिज 1-1 अशी बरोबरीत राहिली. कमिन्सनं आतापर्यंत 9 टेस्ट मॅचमध्ये कॅप्टनपद भूषवलं असून त्यातील 5 मॅच ऑस्ट्रेलिया टीम जिंकली आहे. तर, एका मॅचमध्ये पराभव झाला असून तीन मॅच ड्रॉ झाल्या. उपयुक्त ऑल राऊंडर 29 वर्षीय कमिन्सनं 2011 साली ऑस्ट्रेलियाकडून टी-20, टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत 43 टेस्ट, 73 वन डे आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 199, वन-डे क्रिकेटमध्ये 119 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 52 विकेट आहेत. कमिन्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये दोन हाफ सेंच्युरीही झळकावल्या असून तो बॅटिंग करण्यास सक्षम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.