भुवनेश्वर कुमारवर निवड समितीनं अन्याय केला आहे का?

भुवनेश्वर कुमारवर निवड समितीनं अन्याय केला आहे का?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टच्या मालिकेसाठी (India vs England) 20 सदस्यीय टीमची घोषणा झाली आहे. या टीममध्ये भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) समावेश नाही.

  • Share this:

मुंबई, 8 मे : टीम इंडियाच्या निवड समितीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टच्या मालिकेसाठी (India vs England) 20 सदस्यीय टीमची निवड केली आहे. या टीममध्ये मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचं दुखापतीनंतर पुनरागमन झालं आहे. मात्र निवड समितीच्या एका निर्णयानं सर्वांना धक्का बसला आहे. या टीममध्ये फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला संधी मिळालेली नाही. भुवनेश्वर सध्या फिट असून त्यांनं इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन-डे आणि टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती.

भुवनेश्वर कुमार हा एक उत्तम स्विंग बॉलर असून त्यानं इंग्लंडमध्ये नेहमी चांगली कामगिरी केली आहे. इन स्विंग आणि आऊट स्विंगसह त्याच्याकडं चांगली लाईन आणि लेन्थ आहे. जी या टीममध्ये फक्त बुमराह आणि शमीच्या बॉलिंगमध्येच दिसते.

भुवनेश्वरचा इंग्लंडमध्ये रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारनं इंग्लंडमध्ये 5 मॅचमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 82 रन देऊन 6 विकेट्स घेण्याची कामगिरीही त्यानं केली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेत अन्य बॉलर्स महागडे ठरत असताना भुवनेश्वरनं चांगली कामगिरी केली होती.

वन-डे मालिकेत भुवनेश्वरनं 3 मॅचमध्ये 6 विकेट्स तर 5 टी 20 मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा इकॉनॉमी रेट देखील चांगला होता. या सर्व कामगिरीनंतरही टीम इंडियाच्या निवड समितीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आहे.

वाचा : टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणारा अर्झान नागवासवाला कोण आहे?

भारतीय टीम : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंगर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव

स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अरझान नागवासवाला

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 8:23 AM IST

ताज्या बातम्या