मुंबई, 4 मे : आयपीएल स्पर्धेची रंगत वाढलेली असतानाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं त्यांच्या व्हाईट बॉल टीमचा नवा कॅप्टन जाहीर केला आहे. कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) काही दिवसांपूर्वी आंतररष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं ही जागा रिकामी झाली होती. वेस्ट इंडिज बोर्डानं पोलार्डच्या जागी निकोलस पूरनची (Nicholas Pooran) कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. पूरन यंदाच्या आयपीएल ऑक्शनमधील (IPL Auction 2022) सर्वात महागडा वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला होता. त्याला सनरायझर्स हैदराबादनं (SRH) 11 कोटींना खरेदी केले.
पूरन टी20 क्रिकेटमधील आक्रमक बॅटर आहे. त्यानं आत्तापर्यंत या प्रकारात 300 पेक्षा जास्त सिक्स लगावले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा टी20 वर्ल्ड कप लक्षात घेता त्याची ही नियुक्ती महत्त्वाची आहे. शाई होपला वन-डे टीमचा व्हाईस कॅप्टन बनवण्यात आले आहे. पुढील वर्षी भारतामध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे संचालक जिमी अॅडम्स यांनी यावेळी सांगितलं की, 'निकोलसकडं चांगला अनुभव आहे. तो आता टीम सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचा निवड समितीचा विश्वास आहे.' तर, कॅप्टन होणे हा सन्मान आहे. मी अनेक दिग्गजांचा वारसा चालवणार आहे. मी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,' असे पूरन यांनी सांगितले.
IPL 2022 Points Table : पंजाबच्या विजयानं वाढली रंगत, जाणून घ्या Play off चं समीकरण
आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या पूरननं वेस्ट इंडिजकडून 37 वन-डे खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 40 च्या सरासरीनं 1121 रन केले असून यामध्ये एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये त्यानं 57 इंटरनॅशनल मॅचमध्ये 28 च्या सरासरीनं 1193 रन केले आहेत. पूरननं या प्रकारात 8 अर्धशतकं झळकावली असून त्याचा स्ट्राईक रेट 129 आहे. पोलार्ड कॅप्टन असताना पूरन व्हाईस कॅप्टन होता. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या सीरिजमध्ये त्यानं पोलार्डच्या अनुपस्थितीमध्ये टीमची कॅप्टनसी देखील सांभाळली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022, Kieron pollard, West indies