मुंबई, 4 मे : पंजाब किंग्जनं (Punjab Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 8 विकेट्सनं पराभव करत आयपीएल पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. या विजयानंतर पंजाबनं 8 व्या क्रमांकावरून थेट 5 व्या क्रमांकावर उडी मारली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गुजरात टायटन्सचा (Gujarat Tirants) 10 मॅचधील हा दुसराच पराभव असून 16 पॉईंट्ससह त्यांचा पहिला क्रमांक कायम आहे. आयपीएल स्पर्धेतील दुसरी नवी टीम लखनऊ सुपर जायंट्स 10 मॅचमध्ये 14 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. पंजाब आणि आरसीबीचे आता प्रत्येकी 10 पॉईंट्स असले तरी पंजाबचा रनरेट चांगला असल्यानं त्यांनी आरसीबीला मागे टाकलं आहे. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. पण, दिल्लीचा रनरेट हा केकेआरपेक्षा चांगला असल्यानं दिल्लीची टीम सातव्या आणि केकेआरची टीम आठव्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम असलेली चेन्नई सुपर किंग्स नवव्या तर सर्वात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’ साठी टॉप 4 टीम पात्र होणार आहेत. पॉईंट टेबलमधील सध्याची परिस्थिती पाहाता गुजरातला प्ले ऑफ गाठण्यासाठी आणखी एक विजयाची आवश्यकता आहे. तर आणखी दोन विजयानंतर लखनऊची देखील प्ले ऑफमधील जागा निश्चित होईल. मुंबई इंडियन्सची टीम सर्वात शेवटच्या क्रमांकावर असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
IPL 2022 : लिव्हिंगस्टोनने लगावला सर्वात लांब SIX, थक्क झालेला राशिद जवळ आला आणि…VIDEO
अन्य 7 टीमना अद्यापही ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची संधी आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला सर्वात खडत आव्हान असून त्यांना आता प्रत्येक मॅच जिंकावी लागेल, तसंच अन्य टीमच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागेल. केकेआरचीही साधारण तशीच अवस्था आहे. पंजाबच्या विजयानंतर आरसीबी आणि दिल्लीसाठी मार्ग आणखी खडतर बनला आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनाही आता गाफिल राहून चालणार नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेतील उर्वरित प्रत्येक सामना रंगतदार होणार असून त्यानंतर ‘प्ले ऑफ’ चे समीकरण आणखी बदलणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.