मुंबई, 12 डिसेंबर : टीम इंडियाचा विकेटकीपर-बॅट्समन संजू सॅमसन चांगल्या कामगिरीनंतरही भारतीय क्रिकेट टीममध्ये नियमित संधी मिळालेली नाही. संजूनं 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतरच्या सात वर्षांमध्ये तो फक्त 27 सामने खेळलाय. त्याला सतत टीममधून वगळल्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआयलाही टीकेला सामोरं जावं लागतंय. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सॅमसनला आपल्या टीमकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. संजूचं दमदार उत्तर इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला आश्वासन दिलं आहे, की तो त्याच्या क्रिकेट करिअरसाठी त्या देशात गेला, तर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जाईल. सॅमसनने आयरिश क्रिकेट बोर्डाची ऑफर नाकारली आहे. त्यावर सॅमसनने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. तो म्हणाला, ‘मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचा विचार करणार नाही कारण मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे.’ आयरिश क्रिकेट बोर्ड अशा खेळाडूच्या शोधात आहे जो उत्कृष्ट बॅटिंग करण्यासह कॅप्टन बनू शकेल. संजू सॅमसनने ही ऑफर स्वीकारली असती, तर त्याला भारतीय क्रिकेट टीम सोडावी लागली असती. भारतीय अंडर-19 टीमचा माजी कॅप्टन उन्मुक्त चंदने अशीच ऑफर स्वीकारली होती. तो सध्या अमेरिकेत क्रिकेट खेळतोय. एक खेळाडू किती सहन करेल? सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने BCCIला सुनावलं संजूची उपेक्षा ऑस्ट्रेलियात झालेला T20 विश्वचषक आणि आशिया कप 2022 साठी भारतीय टीममध्ये संजू सॅमसनला निवडलं नव्हतं. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन मॅचेसच्या वनडे सीरिजसाठीही तो भारतीय टीममध्ये नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी त्याला टीममध्ये घेतलं होतं; पण त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये संजू सॅमसन चांगलं खेळला होता. त्याने पहिल्या वनडे मॅचमध्ये नाबाद 86 रन्स करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन वनडे मॅचेसमध्ये त्याने नाबाद 30 आणि 2 धावा केल्या होत्या. भारताने ती सीरिज 2-1ने जिंकली होती. अनुष्काला कधी प्रपोज केलं नाही, विराटने स्वत: सांगितलं होतं कारण संजूचं रेकॉर्ड 28 वर्षीय संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी 16 टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 21.14 च्या सरासरीने आणि 135.15 च्या स्ट्राइक रेटने 296 रन्स केल्या आहेत. तो केवळ 11 वनडे मॅचेस खेळला आहे. त्यात त्याने 66 च्या सरासरीने 330 रन्स काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.