मुंबई, 30 नोव्हेंबर: पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाला संजू सॅमसनवरून जोरदार सुनावलं आहे. कनेरियाचे म्हणणे आहे की, भारतीय निवड समितीने संजू सॅमसनसारख्या खेळाडुला खूपच कमी संधी दिली, तर ऋषभ पंत खराब फॉर्ममध्ये असून त्याला सतत संधी दिली जात आहे.
कनेरियाने संजू सॅमसनची तुलना अंबाती रायडूशी केली. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये रायडूला भारताचा चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याच्या जागी संघात विजय शंकरला घेण्यात आलं होतं. अंबाती रायडूलासुद्धा ही बाब खटकली होती. दुसरीकडे विजय शंकर ना फलंदाजीत चमकला, ना गोलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला.
हेही वाचा: FIFA WC: अमेरिकेकडून ईराणच्या पराभवानंतर ईराणी नागरिकांनी केला जल्लोष, कारण माहितीय का?
दानिश कनेरियाने म्हटलं की, एक खेळाडू शेवटी किती सहन करेल? त्याने खूप काही सहन केलंय आणि त्याला संधी मिळाली तेव्हा चांगली कामगिरीही केली आहे. एका चांगल्या खेळाडुला तुम्ही संधी दिली नाही तर संघावरही याचा परिणाम होईल.
अंबाती रायडूचे आंतरराष्ट्रीय करिअर असंच संपलं. त्यानेही बऱ्याच धावा केल्या, त्यालाही टीका सहन करावी लागली. यामागे कारण बीसीसीआय समिती आहे. समितीमधील राजकारणाने भारतीय क्रिकेटला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. जे आवडते खेळाडु आहेत त्यांनाच फक्त संधी देतात असा आरोपही कनेरियाने भारताच्या निवड समितीवर केला.
हेही वाचा : न्यूझीलंड दौऱ्यात सगळ्याच आघाड्यांवर टीम इंडिया फेल; 10 महिन्यांत कशी होणार वन डे वर्ल्ड कपची तयारी?
संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 66 च्या सरासरीने आणि 104.76च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने 16 टी20 सामन्यात २१.१४ च्या सरासरीने आणि 135.16 च्या स्ट्राइक रेटने 296 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केलं नाहीय. लवकरच तो भारतीय संघाकडून खेळावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pakistan, Sanju samson, Team india