नवी दिल्ली, 04 मार्च : 3 मार्च 2009 हा पाकिस्तान क्रिकेटसाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्यादिवशी लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला (Attack by terrorists) केला. ज्याचा त्रास पाकिस्तानी क्रीडा रसिक अजूनही भोगत आहेत. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला होता.
आता 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ (Australian team) पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे, त्यानंतर आणखी एका धमाक्याने अडचणींचे ढग दाटून आले आहेत. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाला पाकिस्तान दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना रावळपिंडीत आज 4 मार्चपासून खेळवला जात आहे.
पेशावर मशिदीवर आत्मघातकी हल्ला, 30 ठार
आज रावळपिंडीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पेशावरमधील एका मशिदीमध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 30 लोक मारले गेल्याची माहिती आहे. तर 50 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आता सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियन संघही दौरा अर्ध्यावर सोडून परत येऊ शकतो, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना आहे.
हे वाचा - IND vs SL : विराट कोहलीच्या विकेटची झाली होती भविष्यवाणी, वाचून बसेल धक्का
'ऑस्ट्रेलियन संघाने परतावे'
एका यूजरने लिहिलंय - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला असून 30 लोकांचा मृत्यू झाला. हे सर्व ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मालिकेच्या पहिल्या दिवशी घडले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ, कृपया तुमच्या कुटुंबासाठी तो देश सोडा. सर्वजण सुरक्षित राहा. त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिलं आहे - कालही पाकिस्तानमधील मशिदीमध्ये हल्ला झाला, ज्यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला. पाकिस्तानात दररोज दहशतवादी हल्ले होत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने दौरा रद्द करून परतावे.
हे वाचा - IND vs SL : ऋषभ पंतची जोरदार फटकेबाजी.... पण, अखेरच्या क्षणी ठरला दुर्दैवी!
पाकिस्तानसाठी हृदयद्रावक घटना
दुसरीकडे, एका पाकिस्तानी यूजरने लिहिलंय - एकीकडे 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानमध्ये आली आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. आजपासून (4 मार्च) उभय संघांमध्ये पहिली कसोटी खेळवली जात आहे. दुसरीकडे, पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.