मोहाली, 4 मार्च : विराट कोहली (Virat Kohli) शुक्रवारी मोहालीमध्ये शंभरावी टेस्ट खेळण्यासाठी उतरला. 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा विराट हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.त्यानं या खेळीच्या दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रनचा टप्पा पूर्ण केला. विराट शंभराव्या टेस्टमध्ये शतक झळकावेल, या अपेक्षेनं मोहाली टेस्टकडे डोळे लावून बसणाऱ्या फॅन्सची पहिल्या इनिंगमध्ये निराशा झाली. तो 76 बॉलमध्ये 45 रन काढून आऊट झाला. त्याला श्रीलंकन स्पिनर लसिथ एबुलदेनियानं बोल्ड केलं. विराट कोहली आऊट झाल्यानं कॅप्टन रोहित शर्मासह सर्वांनाच धक्का बसला. पण, त्याच्या विकेटची अचूक भविष्यवाणी सोशल मीडियावर करण्यात आली होती. विराट आऊट झाल्यानंतर एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. श्रृती या युझरनं काल रात्री (12.46 AM) हे ट्विट केले होते. त्यामध्ये विराट 100 व्या टेस्टमध्ये शतक करणार नाही. तो एमबुलदेनियाच्या बॉलिंगवर बोल्ड होईल, अशी भविष्यवाणी केली होती.
King Kohli out for 45(76) @imVkohli #100thTestForKingKohli #KingKohli pic.twitter.com/WRSqufkvca
— Chiyaan Praveen (@ARRahmanuyir) March 4, 2022
श्रृतीचं भविष्य मोहाली टेस्टच्या पहिल्याच दिवशी खरं ठरलं. त्यामुळे सध्या वेगानं व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा मााजी क्रिकेटपटून वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) यावर Wow अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Wow!!! https://t.co/zCABz7ReCQ
— Virender Sehwag (@virendersehwag) March 4, 2022
यापूर्वी मोहाली टेस्ट सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीचा खास सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) हस्ते विराटचा सत्कार करण्यात आला. राहुल द्रविडनं सत्कार केल्यानंतर विराट चांगलाच भावुक झाला होता. ‘राहुल भाई या खास क्षणासाठी धन्यवाद. माझी पत्नी माझ्यासोबत इथं आहे. माझा भाऊ स्टँडमध्ये उपस्थ्त आहे. हा टीम गेम आहे. माझा संपूर्ण प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता. बीसीसीआयचेही धन्यवाद. माझ्या लहाणपीच्या हिरोकडून मला हा पुरस्कार मिळतोय. मी अंडर-15 खेळत असतानाच्या काळातील तुमचा फोटो आजही माझ्याकडे आहे.’ अशी प्रतिक्रिया विराटनं व्यक्त केली. Women’s World Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा, यजमान टीमला पराभवाचा धक्का! 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे.