मोहाली, 4 मार्च : टीम इंडियाचा विकेट किपर ऋषभ पंतनं (Rishbah Pant) मोहाली टेस्टमध्ये आक्रमक खेळी केली. त्यानं तिसऱ्या सेशनमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पण, तो अखेर तो दुर्दैवी ठरला. पंतचे शतक फक्त 4 रननं हुकले. तो 96 रनवर आऊट झाला. शतकाच्या उंबरठ्यावर खराब शॉट खेळण्याची चूक त्याला महाग पडली. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलनं (Suranga Lakmal) त्याला बोल्ड केले. ऋषभ पंतनं यापूर्वी दक्षिण आफ्रिका सीरिजमधील केपटाऊनमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने सलग दुसऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावण्याची त्याची संधी हुकली. मोहालीमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्यानंतर लगेच हनुमा विहारी आऊट झाला. पंतनं या परिस्थितीमध्ये सुरूवातीला सावध खेळ केला. त्यानं श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी 53 रनची पार्टनरशिप केली. श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर पंतची जडेजासोबत जोडी जमली.
Rishabh Pant falls four runs short of a Test ton.
— ICC (@ICC) March 4, 2022
India are 332/6.#WTC23 | #INDvSL | https://t.co/mo5BSRndfA pic.twitter.com/gJCiV7Caof
या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 104 रनची भागिदारी करत टीम इंडियाची स्थिती भक्कम केली आहे. पंतने त्याचे अर्धशतक 73 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केले होते. अर्धशतकानंतर त्याने वेग वाढवला. पंतनं 97 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 96 रन केले. IND vs SL : विराट कोहलीच्या विकेटची झाली होती भविष्यवाणी, वाचून बसेल धक्का ऋषभ पंत आऊट झाला असला तरी त्यानं केलेल्या आक्रमक बॅटींगमुळे टीम इंडियानं पहिल्याच दिवशी 325 रनचा टप्पा पूर्ण केला. ऋषभ पंतपूर्वी हनुमा विहारीनं अर्धशतक झळकावले. विहारीनं 58 रन केले. तर विराट कोहली 45 रन काढून आऊट झाला.