मुंबई, 14 जानेवारी : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका बसला आहे. क्रिकेट विश्व देखील त्याला अपवाद नाही. अनेक क्रिकेट सामने यामुळे रद्द झाले आहेत. तसेच मालिकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार (New Zeland vs Australia) होती. लिमिटेड ओव्हर क्रिकेटच्या सामन्यांची मालिका या दौऱ्यात खेळली जाणार होती. हा दौरा आता संकटात सापडला आहे.
न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने फेब्रुवारी महिन्यातील क्वारंटाईन जागेचे बुकिंग केलेले नाही. कारण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर त्याची गरज भासेल असे त्यांच्या क्रिकेट बोर्डाला वाटले नव्हते. यापूर्वी जानेवारी महिन्याच्या पहिल्या हाफ पर्यंतच हे बुकिंग करणे आवश्यक होते. पण, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे ही मर्यादा फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यूझीलंड टीम 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात क्रिकेट मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाशी चर्चा सुरू
ऑस्ट्रेलियाचा दौरा होईल अशी आशा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासोबत नव्या पर्यायावरही चर्चा केली जात आहे. यामध्ये टीम ऑस्ट्रेलियातून उशीरा परत येणे तसेच संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक नव्याने तयार करणे याचा समावेश आहे.
मोठी बातमी! जोकोविचची होणार ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी, सरकारने पुन्हा केला व्हिसा रद्द
नवी योजना तयार होईपर्यंत न्यूझीलंडची टीम ऑस्ट्रेलिया सोडणार नाही, अशी माहिती क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने दिली आहे. यापूर्वी कोरोनाच्या नियमामुळेच न्यूझीलंडने अंडर 19 वर्ल्ड कपमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर स्कॉटलंडची टीम ही स्पर्धा खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, New zealand