Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी! जोकोविचची होणार ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी, सरकारने पुन्हा केला व्हिसा रद्द

मोठी बातमी! जोकोविचची होणार ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी, सरकारने पुन्हा केला व्हिसा रद्द

टेनिस विश्वातील नंबर 1 टेनिसपटू नोव्हाक जोकोविच  विरुद्ध ऑस्ट्रेलियन सरकार (Novak Djokovic vs Australia Government) यांच्यातील वादाने आता नवं वळण घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने शुक्रवारी दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मेलबर्न, 14 जानेवारी : टेनिस विश्वातील नंबर 1 टेनिसपटू नोव्हाक जोकोविच विरुद्ध ऑस्ट्रेलियन सरकार (Novak Djokovic vs Australia Government) यांच्यातील वादाने आता नवं वळण घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने शुक्रवारी दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. जोकोविचने कोरोना लस (Corona Vaccine) घेतलेली नाही, त्यामुळे तो अन्य नागरिकांसाठी धोका असल्याचे कारण सरकारने दिले आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलियन कोर्टाने सरकारचा आदेश रद्द करत जोकोविचला दिलासा दिला होता. त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा त्यांचे अधिकार वापरत जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. नागरिकांच्या हितासाठी, स्थलांतर कायद्यातील 133 C (3) कलमाच्या अंतर्गत जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा अधिकार सरकार वापरत आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन मंत्र्यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचची ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी होणार आहे.

जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. आपली मागणी मान्य झाल्याचा दावा करत जोकोविच मागच्या आठवड्यात मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्याला विमानतळावरच अडवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी इमिग्रेशन सेंटरमध्ये करण्यात आली. सरकारच्या निर्णयाला जोकोविचने ऑस्ट्रेलियातील कोर्टात आव्हान दिले होते.

IND vs SA : भारतीय खेळाडू दबावात असल्याचे सिद्ध! 'त्या' घटनेवरून आफ्रिकेचा पलटवार

ऑस्ट्रेलियन कोर्टानं जोकविचला दिलासा देत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने पुन्हा एकदा त्याचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत जोकोविच खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील नियमानुसार त्याच्यावर देशात प्रवेश करण्यास 3 वर्षांची बंदी लादली जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Australia, Corona vaccine, Tennis player