मुंबई, 17 मार्च : क्रिकेटचं नियमन करणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबनं (MCC) काही नव्या नियमांना मंजूरी दिली आहे. यानुसार एखादा बॅटर कॅच आऊट झाल्यानंतर त्याने क्रिझ क्रॉस केले असले तरी नवीन बॅटर स्ट्राईकवर येणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून हे नियम लागू होणार आहेत. पण आयपीएल स्पर्धेत या सिझनपासूनच (IPL 2022) हा नियम लागू होणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सदस्य असलेला न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जिमी निशमनं (Jimmy Neesham) आयसीसीच्या या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला हा नियम समजला नाही. या नियमाचा काय त्रास होता? मॅचच्या परिस्थितीबाबत जागरूक असलेल्या बॅटरला याचा फायदा होईल. मला हा नियम आवडला नाही, असे ट्विट नीशमनं केले आहे.
I don’t really understand the point of this. Has this rule ever been a problem? Also rewards batsmen who don’t stay aware of the match situation.
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) March 16, 2022
Don’t like it. https://t.co/6yPsHjFNSk
इंग्लंडमध्ये मागच्या वर्षी झालेल्या ‘द हंड्रेड’ मध्ये हा नियम लागू करण्यात आला होता. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये बॉलर्सला फायदा मिळावा, असा या नियमाचा उद्देश आहे. या नियमानुसार कॅच आऊट झाल्यानंतर नवा खेळाडू स्ट्राईकवर येईल. त्या परिस्थितीमध्ये मैदानात सेट असलेल्या बॅटरपेक्षा नवा खेळाडू आक्रमक शॉट लगावण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानचा पराभव झाला असता तर चांगलं झालं असंत… शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जिमी निशमची ही चौथी आयपीएल टीम आहे. त्याने आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार खेळ करणाऱ्या निशमकडून राजस्थान रॉयल्सला मोठ्या अपेक्षा आहेत.