मुंबई, 17 मार्च : बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांच्या दमदार शतकामुळे पाकिस्ताननं ऑस्ट्रेलिया विरूद्धची कराची टेस्ट ड्रॉ केली आहे. तीन मॅचच्या या टेस्ट सीरिजमध्ये (Pakistan vs Australia) पहिली टेस्ट देखील ड्रॉ झाली होती. बाबरनं कराचीमध्ये 196 रनची खेळी केल्यानं सोशल मीडियावर पाकिस्तानी फॅन्स त्याची जोरदार प्रशंसा करत आहेत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) बाबरच्या खेळीचं कौतुक केलंय. पण त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) नाराजी व्यक्त केली आहे. कराची टेस्टमध्ये दोन्ही टीमनं भरपूर रन काढले. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 556 रन केले होते. तर पाकिस्ताननं दुसऱ्या इनिंगमध्ये 443 रन केले. या मॅचमध्ये ड्रॉ पेक्षा पराभव झाला असता तर चांगलं झालं असतं, किमान यामधून काही तरी शिकायला मिळालं असतं असा दावा अख्तरनं केला आहे. शोएबनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) जोरदार टीका केली. ‘तुम्ही इतकी स्लो पिच बनवली की ती पाहून कुणालाही झोप येईल. हा एक ऐतिहासिक दौरा आहे. या दौऱ्यात अशा प्रकारची संथ पिच तयार करून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे. तुमच्याकडे शाहिन आफ्रिद्रीसारखा फास्ट बॉलर आहे. तरीही कसला विचार करत आहात. माझ्या काळातही हेच होत होते.’ अख्तर पुढे म्हणाला, ‘तिसऱ्या टेस्टमध्ये निकाल लागेल अशी पिच बनवली पाहिजे. हारलं तर काय होईल, आपण काही तरी शिकू. तुम्ही 500 रन करत आहात. भारताच्या दौऱ्याच्या वेळी देखील अशाच प्रकारचे पिच केले होते. त्यावेळा एकट्या सेहवागनं 300 रन केले. मी बॅटरचं श्रेय घेत नाही पण बॉलर्सना काही तरी संधी द्या.’ धोनीच्या टीमनं उडवली क्रिकेटची थट्टा, 1 हजार रनची आघाडी घेऊन संपवली मॅच अख्तरनं यावेळी 196 रनची खेळी करणाऱ्या बाबर आझमचं कौतुक केलं. ‘बाबरनं जबरदस्त खेळ केला. तो पाकिस्तानसाठीा सुपरमॅन आहे. त्याला पाहून नव्या पिढीतील मुलं क्रिकेट खेळणे सुरू करतील. त्याला द्विशतक करता आलं नाही, याचं मला दु:ख आहे. पण त्याच्या खेळानं प्रेरित झालेले अनेक खेळाडू भविष्यात तयार होतील.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.