मुंबई, 12 डिसेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या वन-डे सीरिजपासून त्याचा कार्यकाळ सुरू होईल. न्यूझीलंड विरुद्ध मागील महिन्यात झालेल्या टी20 सीरिजमध्ये तो टी20 टीमचा कॅप्टन बनला आहे. यापूर्वी या दोन्ही टीमची जबाबदारी विराट कोहलीकडे (Virat Kohli) होती. टीम इंडियाची 'व्हाईट बॉल' क्रिकेटमधील जबाबदारी विराटकडून रोहितच्या खांद्यावर येताच टीम इंडियाच्या दिग्गजाला अच्छे दिन येणार, असे मानले जात आहे.
रोहितने क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R. Ashwin) प्रशंसा केली आहे. 'अश्विन बॉलर म्हणून अनेक पर्याय उपलब्ध करून देतो. त्याचा पॉवर प्ले मध्ये देखील वापर केला जाऊ शकतो. मी त्याला ऑल राऊंडर बॉलर असे म्हणेल. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कुठेही बॉलिंग करू शकतो.
तुम्हाला एकाच प्रकारचा बॉलर नको असतो. जो फक्त पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो आणि डेथ ओव्हरमध्ये करत नाही. किंवा जो फक्त डाव्या किंवा उजव्या बॅटर्सला बॉलिंग करू शकेल. बॉलर्सच्या बाबतीत जितके जास्त पर्याय असतील तितकं चांगलं असेल. मला नक्की खात्री आहे की, तो (अश्विन) लिमिटेड ओव्हर क्रिकेट दीर्घकाळ खेळणार आहे.' असे रोहितने स्पष्ट केले.
अश्विनला सर्वात जास्त विकेट्स
अश्विनला यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये 3 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने न्यूझीलंड विरूद्धच्या 2 टेस्टमध्ये 14 विकेट्स घेतल्या. त्याने नुकताच टेस्ट क्रिकेटमधील हरभजन सिंगचा एकूण विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मागे टाकला आहे. 2021 मधील टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. या वर्षभरात 50 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्विन हा एकमेव बॉलर आहे.
Ashes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के
विराट कोहली कॅप्टन होता तेव्हा 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चार वर्षे त्याला लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्याला बाहेर बसावे लागले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli