मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के

Ashes Series: पहिली टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडला बसले आणखी 2 धक्के

ऑस्ट्रिलाया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं  दणदणीत पराभव झाला. या पराभवातून सावरण्याचं आव्हान असतानाच इंग्लंडला आणखी 2 धक्के बसले आहेत.

मुंबई, 12 डिसेंबर : ऑस्ट्रिलाया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं  दणदणीत पराभव झाला. आता दुसऱ्या टेस्टमध्ये या पराभवातून बाहेर येण्याचं इंग्लंडसमोर आव्हान आहे. त्यापूर्वीच इंग्लंडच्या क्रिकेट टीमला (England Cricket Team) आयसीसीने दोन मोठे धक्के दिले आहेत. इंग्लंडने ब्रिस्बेन टेस्टमध्ये निर्धारित वेळेत 5 ओव्हर्स कमी टाकले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसीने इंग्लंडच्या संपूर्ण टीमची मॅच फिस कापून घेतली आहे. निर्धारित एक ओव्हर कमी टाकली म्हणून प्रत्येक खेळाडूची 20 टक्के मॅच फिस कापून घेण्यात येते. इंग्लंडने 5 ओव्हर्स कमी टाकल्याने इंग्लंडची 100 टक्के मॅच फिस कमी करण्यात आली आहे. त्याचबोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील (WITC) 5 पॉईंट्सही आयसीसीने कमी केले आहेत.  त्यामुळे जो रूटच्या (Joe Root) टीमला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा बॅटर ट्रेव्हिस हेड (Travis Head) याने आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल त्याच्या मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी हेडने इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली होती.

ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश टीमला कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी इंग्लंडचा 9 विकेट्सनं मोठा पराभव करत या पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशी लंचनंतर काही वेळातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

इंग्लंडची दुसरी इनिंग 297 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना विजयासाठी फक्त 20 रनचे टार्गेट होते. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत इंग्लंडचा मोठा पराभव केला. अ‍ॅलेक्स कॅरी 9 रन काढून आऊट झाला. रॉबिनसनने त्याला आऊट केले.  या सीरिजमधील दुसरी टेस्ट 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Ashes, Cricket, England, Icc