Home /News /sport /

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपदाच्या युक्त्या शिकल्या का? स्वतःच केला खुलासा

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपदाच्या युक्त्या शिकल्या का? स्वतःच केला खुलासा

IPL 2022 मध्ये, गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्जवर 10वा विजय नोंदवून क्वालिफायर-1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. हार्दिक पांड्याने (hardik pandya) कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात चमकदार कामगिरी केली आहे. धोनीच्या संघाला पराभूत केल्यानंतर त्याने आपल्या यशाचे कारण सांगितले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 मे : IPL 2022 च्या प्लेऑफसाठी आधीच स्थान पक्क केलेल्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मोसमातील 10वा विजय नोंदवला. या विजयासह टायटन्सने क्वालिफायर 1 मध्ये स्थान पक्के केलं. पदार्पणाचा हंगाम असूनही हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) नेतृत्वाखालील गुजरात संघाने या मोसमात आतापर्यंत शानदार खेळ दाखवला आहे. संघाने 13 पैकी 10 सामने जिंकले असून 20 गुण मिळवले आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरातने 5 चेंडूत 3 गडी गमावून 134 धावांचे लक्ष्य गाठले. आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या सुरुवातीलाच योग्य सांघिक संतुलनाशिवाय गुजरातचा संघ अननुभवी दिसत असल्याची चर्चा होती. या संघाचा सुरुवातीचा विजय हा योगायोग म्हणून घेतला गेला किंवा त्याला नशिबाशी जोडलं गेलं. पण जसजसा आयपीएल पुढे सरकत गेला तसतसा या संघाने आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली आणि 10व्या विजयासह हा संघ टॉप-2 संघ म्हणून लीग टप्पा पूर्ण करेल. आम्हाला सामना संपवण्याची घाई नव्हती: हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याही या विजयाने खूप खूश दिसला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “आम्हाला सामना संपवण्याची घाई नव्हती. कारण अतिरिक्त मार्क्स मिळायचे नव्हते. जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते आणि आमचे लक्ष त्याकडे होते. IPL 2022: धोनी म्हणाला, मिळाला दुसरा मलिंगा; आयपीएलच्या पहिल्या चेंडूवर घेतली विकेट! पहा VIDEO 'मुंबई इंडियन्सचा अनुभव कर्णधारपदाच्या कामी येतोय' आपल्या कर्णधारपदाबद्दल हार्दिक म्हणाला, “मी आतापर्यंत या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. कारण आधीच्या फ्रँचायझीमध्ये खेळाडूंवर बरीच जबाबदारी देण्यात आली होती. मीही ती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. कर्णधार म्हणून मला खूप फायदा झाला आहे. एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी जे काही केले होते, हा अनुभव कर्णधार म्हणून कामी आला. वास्तविक, हार्दिक त्याच्या मागील आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) संदर्भ देत होता. 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून हार्दिक मुंबई इंडियन्ससोबत होता. त्याने या संघासाठी 1476 धावा करत 42 बळी घेतले. तो संघाच्या नेतृत्व गटाचा भाग होता. यावेळी त्याने कर्णधारपदाच्या युक्त्या जाणून घेतल्या, ज्या गुजरात टायटन्सची कमान सांभाळताना उपयोगी पडत आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Mumbai Indians

    पुढील बातम्या