मुंबई, 1 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी त्यांचा स्टार ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) इतिहास रचला आहे. ब्राव्हो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर बनला आहे. ब्राव्होनं मुंबई इंडियन्सचा माजी बॉलवर लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) मागे टाकले आहे. ब्राव्होनं लखनऊच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) आऊट करत मलिंगाचा 170 विकेट्सचा रेकॉर्ड तोडला. चेन्नईचा कॅप्टन रविंद्र जडेजानं हुड्डाची कॅच घेत या ऐतिहासिक विकेटमध्ये योगदान दिलं. वेस्ट इंडिजच्या ब्राव्होनं 153 आयपीएल मॅचमध्ये 171 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगानं 122 मॅचमध्ये 170 विकेट्स घेतल्या होत्या. ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससह मुंबई इंडियन्स आणि गुजरात लॉयन्स टीमकडून खेळला आहे.
🚨 𝕄𝕚𝕝𝕖𝕤𝕥𝕠𝕟𝕖 𝔸𝕝𝕖𝕣𝕥 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
1⃣7⃣1⃣ wickets & going strong! 👏 👏
Congratulations to @DJBravo47 - the leading wicket-taker in the history of the IPL. 🔝 🙌
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB#TATAIPL | #LSGvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/VQUm6UskWz
आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 बॉलर्समध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे. ब्राव्हो या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून आता मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मागील सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला अमित मिश्रा 166 विकेट्ससह तिसऱ्या तर पियूष चावला 157 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर हरभजन सिंगच्या नावावर 150 विकेट्स आहेत. IPL 2022 : Ayush Badoni च्या खतरनाक सिक्सनं महिला फॅन जखमी, पाहा LIVE VIDEO गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (LSG vs CSK) 6 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 210 रन केले होते. लखनऊनं 211 रनचं टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे.यापूर्वी त्यांचा कोलकाता नाईट रायडर्सनं पराभव केला होता. चेन्नईची पुढील मॅच आता पंजाब किंग्ज विरूद्ध रविवारी आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून पराभवाची मालिका तोडण्याचं आव्हान नवोदित कॅप्टन रविंद्र जडेजावर आहे.