मुंबई, 1 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आयपील स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. लखनऊनं गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईनं दिलेलं 211 रनचं मोठं आव्हान लखनऊनं शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि नवोदीत आयुष बदोनी (Ayush Badoni) या विजयाचे शिल्पकार ठरले. लुईसनं या आयपीएल सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावत 23 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले. या खेळीत त्यानं 6 फोर आणि 3 सिक्स लगावले. तर बदोनीनं 9 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 19 रन केले. या दोघांनी निर्णायक क्षणी 19 बॉलमध्ये 40 रनची भागिदारी करत लखनऊला विजय मिळवून दिला. लुईस-बदोनी जोडीनं चेन्नईच्या शिवम दुबेला (Shivam Dube) टार्गेट केले. दुबेनं टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये त्यांनी 25 रन करत मॅच लखनऊच्या बाजूनं झुकवली. या ओव्हरमध्ये आयुष बदोनीनं एक खतरनाक सिक्स लगावला. बदोनीनं मारलेला सिक्स प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिला फॅनच्या डोक्याला लागला. ही महिला सीएकेची फॅन होती. या आयपीएलमध्ये फॅनला बॉल लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं मारलेला बॉलही फॅनला लागला होता. यापूर्वी टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं 7 आऊट 210 रन केले. चेन्नईकडून अनुभवी रॉबिन उथप्पानं सर्वाधिक 50 रन केले. ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा फेल गेला. पहिल्या मॅचमध्ये शून्यावर आऊट झालेला ऋतुराज यावेळी फक्त 1 रन काढून रन-आऊट झाला. मोईन अली (35) आणि शिवम दुबे (49) यांनी फटकेबाजी करत चेन्नईचा स्कोर 150च्या पार पोहचवला. IPL 2022 : गंभीरचा मास्टरस्ट्रोक धोनीवर भारी! मॅच जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया Viral माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं 6 बॉलमध्ये 266.66 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 16 रन काढले. धोनीनं शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईला 210 रन करता आले. पण अखेर हा स्कोर देखील कमीच पडला. सीएसकेची पुढील मॅच रविवारी पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.