मुंबई, 05 फेब्रुवारी : अरमान जैन आणि अनीसा मल्होत्रा यांचं लग्न बॉलिवूडच्या रॉयल वेडिंग पैकी एक ठरलं. हे दोघंही नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. पण या लग्नात सर्वात जास्त चर्चा झाली ती कपूर सिस्टर्सची. भावाचं लग्न असल्यानं करिना आणि करिश्मा या दोघींचाही जलवा पाहायला मिळाला. भावाच्या वरातीत दोन्ही बहीणींनी धम्माल ठुमके लगावले. करिना–करिश्माच्या डान्सचे काही इनसाइड व्हिडीओ आता समोर आले आहेत. भाऊ अरमान जैनच्या लग्नात करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा ट्रेडिशनल लुक पाहायला मिळाला. यलो कलरच्या साडीत करिना खूपच स्टनिंग दिसत होती. तर दुसरीकडे करिश्मानं पिंक कलरची सिल्क साडी नेसली होती. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. बॉलिवूडच्या रॉयल वेडिंग पैकी एक मानल्या जाणाऱ्या या लग्नात अरमान आणि अनीसा यांचाही रॉयल लुक पाहायला मिळाला. अरमाननं व्हाइट शेरवानी घातली होती. तर लाल रंगाच्या दुल्हन लेहंग्यात अनीसा सुद्धा खूप सुंदर दिसत होती. ‘माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम’ लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेशची जेनेलियाकडे कबुली
करिनाचा मुलगा तैमुर एरवी सुद्धा चर्चेत असतो. पण मामाच्या लग्नात तैमुरनंही खूप एन्जॉय केलं. संपूर्ण वरातीत तैमुर बाबा सैफच्या खांद्यावर बसून नाचताना दिसला. त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. याशिवाय करिना आणि करिश्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात या दोघीही भाऊ अरमानसोबत डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमान किंवा रणवीर नाही, तर ‘हा’ अभिनेता दिसणार ‘धूम 4’मध्ये
अरमान जैन हा ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांची बहीण रिमा जैनचा मुलगा आहे. अरमाननं त्याचा बॉलिवूड करिअरची सुरुवात 2014 मध्ये आलेल्या ‘लेकर हम दिवना दिल’ या सिनेमातून केली होती. मात्र त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.
या लग्नात ऋषी कपूर यांचं कुटुंब सहभागी होऊ शकलं नाही. लग्नाच्या आधीच ऋषी कपूर यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटरवरून दिली. त्यानंतर काल पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये मात्र नितू कपूर आणि रणबीर कपूर यांनी आलिया भटसोबत सहभागी झाले होते. Tanhaji कडून बॉक्स ऑफिसचा गड सर, 25 व्या दिवशी केली इतकी कमाई

)







