मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेनंतर टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2022) तयारी सुरू होईल. या संपूर्ण सिझनमध्ये टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रन करण्यासाठी झगडत आहेत. आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे टीम इंडियाचे आजी-माजी कॅप्टन या सिझनमध्ये फ्लॉप ठरले आहेत. विराटनं 13 सामन्यात 20 पेक्षा कमी सरासरीनं 236 रन केले आहेत. त्यानं फक्त एक अर्धशतक झळकावले असून तब्बल तीन वेळा विराट गोल्डन डकवर आऊट झाला आहे. त्याचा स्ट्राईक रेट 113 आहे. विराटची आयपीएल स्पर्धेत गेल्या 14 वर्षांमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे.यापूर्वी त्यानं 2008 साली यापेक्षा कमी रन केले होते. विराटच्या या खराब खेळाचा परिणाम आरसीबीच्या कामगिरीवरही झाला असून ‘प्ले ऑफ’ मधील त्यांची जागा अनिश्चित आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची अवस्था तर विराटपेक्षा बिकट आहे. रोहितनं आत्तापर्यंतच्या 12 सामन्यात 18 च्या सरासरीनं आणि 125 च्या स्ट्राईक रेटनं 218 रन केले आहेत. या सिझनमध्ये 5 वेळा रोहितला दोन अंकी रन करण्यात अपयश आले असून एकदा तो शून्यावर आऊट झाला आहे. त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रोहितच्या मुंबई इंडियन्सचं आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आलंय. IPL 2022 : आम्हाला जिंकणे शक्य होते, पण… सलग दुसऱ्या पराभवानंतर राहुलची नाराजी उघड गांगुलीची प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ‘मिड डे’ शी बोलताना या दिग्गज क्रिकेटपटूंच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली म्हणाले, ‘मला विराट आणि रोहितच्या फॉर्मची अजिबात काळजी नाही. ते खूप चांगले क्रिकेटपटू आहेत. टी20 वर्ल्ड कप अद्याप लांब आहे. या स्पर्धेपूर्वी ते फॉर्म परत मिळवतील याची मला खात्री आहे,’ असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.