मुंबई, 30 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 20 रननं पराभव केला. लखनऊनं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 153 रन केले. पंजाबला 154 रनचं आव्हान झेपलं नाही. त्यांच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. लखनऊच्या बॉलर्सनी पिचचा वापर करत पंजाबला 8 आऊट 133 रनवरच रोखलं. लखनऊकडून फास्ट बॉलर मोहसीन खाननं 24 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर दुश्मंथा चमिरानं 17 रन देत 2 विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यालाही 2 विकेट्स मिळाल्या. तर रवी बिश्नोईनं 1 विकेट घेतली. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोनं सर्वाधिक 32 रन केले. लखनऊचा हा नऊ मॅचमधील सहावा विजय आहे. या विजयासह त्यांचे 12 पॉईंट्स झाले असून पॉईंट टेबलमध्ये लखनऊची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना आता आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे. पॉईंट टेबलमध्ये गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) टीम पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातनं 8 पैकी 7 सामने जिंकले असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 8 पैकी 6 सामने जिंकले असून 12 पॉईंट्ससह राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबादनं (SRH) 8 मॅचमध्ये 5 विजय मिळवले असून ही टीम 10 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) 9 मॅचमध्ये तितक्याच पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्जची (Punjab Kings) या पराभवानंतर डोकेदुखी वाढली आहे. पंजाबचा 9 मॅचमधील हा पाचवा पराभव आहे. पंजाबचे सध्या 8 पॉईंट्स असून पॉईंट टेबलमध्ये ही टीम सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
Happy Birthday Rohit Sharma : क्रिकेटर होण्यासाठी आई-वडिलांपासून वेगळा राहिला, बॉलर म्हणून सुरूवात!
कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमची यंदा निराशाजनक कामगिरी झाली आहे. या टीम सध्या अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.