मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Happy Birthday Rohit Sharma : क्रिकेटर होण्यासाठी आई-वडिलांपासून वेगळा राहिला, बॉलर म्हणून सुरूवात! वाचा कसा घडला 'हिटमॅन'

Happy Birthday Rohit Sharma : क्रिकेटर होण्यासाठी आई-वडिलांपासून वेगळा राहिला, बॉलर म्हणून सुरूवात! वाचा कसा घडला 'हिटमॅन'

वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस (Happy Birthday Rohit Sharma) आहे. जगातील टॉप क्रिकेटर होण्याचा प्रवास रोहितसाठी सहज घडलेला नाही.

वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस (Happy Birthday Rohit Sharma) आहे. जगातील टॉप क्रिकेटर होण्याचा प्रवास रोहितसाठी सहज घडलेला नाही.

वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस (Happy Birthday Rohit Sharma) आहे. जगातील टॉप क्रिकेटर होण्याचा प्रवास रोहितसाठी सहज घडलेला नाही.

मुंबई, 30 एप्रिल :  रोहित शर्मा (Rohit Sharma) आज क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित नाव आहे. तो सध्या टीम इंडियाच्या सर्व फॉर्मेटचा कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणून 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. आता भारतीय क्रिकेट टीमला त्याच्याकडून आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस (Happy Birthday Rohit Sharma) आहे. जगातील टॉप क्रिकेटर होण्याचा प्रवास रोहितसाठी सहज घडलेला नाही.त्यानं अत्यंत गरिबीत कष्ट घेत हे शिखर गाठलंय. 'हिटमॅन' च्या आयुष्याची गोष्ट सर्वांना प्रेरणा देणारी आहे.

नागपूरमध्ये जन्म आणि बालपण

रोहित शर्माचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्याची आई पौर्णिमा आंध्र प्रदेशातील आहे. तर वजील गुरूनाथ शर्मा ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये केअरटेकर होते. वडिलांच्या कमी पगारामुळे रोहित त्याचे आजोबा आणि काकांकडे बोरिवलीमध्ये राहत असे. तो आठवड्यातून एकदा डोंबिवलीमध्ये आई-वडिलांना भेटायला जात असेल. रोहितनं 1999 साली त्यानं काकांच्या पैशानं एका क्रिकेट कॅम्पमध्ये भाग घेतला. त्यावेळी त्याचे कोच दिनेश लाड यांनी त्याला शाळा बदलण्याची सूचना केली. पण, रोहितकडं इतके पैसे नव्हते.

रोहित शर्मानं अखेर शाळा बदलली आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली. तो पुढील 4 वर्ष तयारी करत होता. त्यानं ऑफ स्पिनर म्हणून क्रिकेट कारकिर्दी सुरू केली. त्याचे कोच दिनेश लाड यांनी रोहितला बॅटींग करताना पाहिलं आणि त्याला आठव्या नंबरहून थेट ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला. रोहितनं हॅरीस शिल्ड स्पर्धेत हा निर्णय खरा ठरवला. या स्पर्धेच्या पदार्पणातच त्यानं शतक झळकावलं.

सिनिअर क्रिकेटमध्ये पदार्पण

रोहित शर्मानं 25 फेब्रुवारी 2006 रोजी देवधर ट्रॉफी स्पर्धेतून सिनिअर क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मॅचमध्ये पार्थिव पटेल त्याचा कॅप्टन होता. रोहितला पहिल्या मॅचमध्ये 8 व्या क्रमांकावर पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं 47 बॉलमध्ये 31 रन करत टीमला विजय मिळवून दिला.

IPL 2022 : रोहित- विराटच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, BCCI अध्यक्ष म्हणाले...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

रोहित शर्मानं जून 2007 साली आयर्लंड विरूद्ध आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. त्यानं क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध 40 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले होते. फायनलमध्ये पाकिस्तान विरूद्ध 16 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. त्यानं 2015 आणि 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही दमदार कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. रोहितनं 45 टेस्टमध्ये 8 शतक आणि 14 अर्धशतकांसह 3137 रन केले आहेत. तर 230 वन-डे मॅचमध्ये 40 च्या सरासरीनं 9283 रन केले आहेत. यामध्ये 29 शतक आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं T20 इंटरनॅशनलमध्ये 125 मॅचमध्ये 4 शतक आणि 26 अर्धशतकांच्या जोरावर 3313 रन केले आहे. रोहितनं टी20 क्रिकेटमध्ये एकूण 10 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. तसंच हॅट्ट्रिक देखील घेतली आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, On this Day, Rohit sharma