जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : पहिल्या बॉलवर पृथ्वीला खिंडार! उमेश यादवनं हे काय केलं... VIDEO

IPL 2022 : पहिल्या बॉलवर पृथ्वीला खिंडार! उमेश यादवनं हे काय केलं... VIDEO

फोटो - BCCI

फोटो - BCCI

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फास्ट बॉलर उमेश यादवनं (Umesh Yadav) या आयपीएलची सुरूवात जोरदार केली होती. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्येही त्यानं कमाल केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फास्ट बॉलर उमेश यादवनं (Umesh Yadav) या आयपीएलची सुरूवात जोरदार केली होती. केकेआरनं सुरूवातीला मिळवलेल्या विजयात उमेशच्या बॉलिंगचा मोलाचा वाटा होता. उमेशनं पहिल्या 6 ओव्हर्सच्या  ‘पॉवर प्ले’ मध्ये झटपट विकेट्स घेतल विरोधी टीमला खिंडार पाडले होते. त्यानंतर उमेशची कामगिरी घसरली आणि केकेआरच्या पराभवाची मालिका सुरू झाली. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्येही केकेआरचा (DC vs KKR) पराभव झाला. केकेआरची पराभवाची मालिका सुरूच आहे. पण या मॅचमध्ये उमेशनं दमदार बॉलिंग केली. 147 रनचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची टीम मैदानात उतरल्यावर त्यांच्या इनिंगमधील पहिल्याच बॉलवर उमेशनं विकेट घेतली. उमेशनं पहिल्याच बॉलवर दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉची (Prithvi Shawa) विकेट घेतली. उमेशनं अचूक टप्प्यावर टाकलेला बॉल पृथ्वीला कळालाच नाही. तो बॉल त्याच्या बॅटला लागला आणि उमेशनं स्वत:च्याच बॉलिंगवर  पृथ्वीचा अफलातून कॅच पकडला. पहिल्याच बॉलवर बसलेल्या या मोठ्या धक्क्यामुळे पृथ्वी शॉ सह दिल्लीची संपूर्ण टीम हादरली होती. उमेशनं संपूर्ण मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 24 रन देत 3 विकेट्स घेतल्या. उमेशनं पृथ्वी शॉसह डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत या दिल्लीच्या प्रमुख खेळाडूंना आऊट करत केकेआरला विजय मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याचे हे प्रयत्न अपुरे ठरले. दिल्लीनं 4 विकेट्स आणि 1 ओव्हर राखत ही मॅच जिंकली. IPL 2022 : मागच्या सिझनमध्ये हिरो, यंदा झिरो! 2 खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळे KKR अडचणीत दिल्लीने या विजयासह पंजाबला धक्का देत सहाव्या क्रमांकावर उडी मारली. दिल्लीचा आठव्या सामन्यातील हा चौथा विजय तर कोलकाताचा नवव्या सामन्यात सहावा पराभव ठरला आहे. अशा परिस्थितीत आता केकेआरचा प्लेऑफचा मार्ग आणखी खडतर बनला आहे. या खडतर मार्गात उमेशची बॉलिंग हाच केकेआरचा मोठा आधार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात