जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 3 खेळाडूंच्या जोरावर KKR ला चॅलेंज देणार हैदराबाद, पाहा संभाव्य Playing 11

IPL 2022 : 3 खेळाडूंच्या जोरावर KKR ला चॅलेंज देणार हैदराबाद, पाहा संभाव्य Playing 11

IPL 2022 : 3 खेळाडूंच्या जोरावर KKR ला चॅलेंज देणार हैदराबाद, पाहा संभाव्य Playing 11

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. या मॅचमध्ये हैदराबादची भिस्त 3 खेळाडूंवर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात लढत होत आहे. मागील दोन सामने जिंकल्यानंतर हैदराबादची टीम फॉर्मात असून त्यांना पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या खेळाची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असेल. हैदराबादला या मॅचमध्ये ऑल राऊंडर वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) कमतरता जाणवणार आहे. सुंदर दुखापतग्रस्त असल्यानं ही मॅच खेळणार नाही. सुंदरच्या अनुपस्थितीमध्ये हैदराबादची टीम तीन खेळाडूंवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीवर आहे. कॅप्टन विल्यमसननं गुजरात विरूद्ध तर अभिषेकनं हैदराबाद विरूद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्यांनी चांगली सुरूवात करत टीमच्या विजयाचा पाया रचला. ‘पॉवर प्ले’ मध्ये सातत्यानं चांगली बॉलिंग करत असलेल्या उमेश यादवचं त्यांना या मॅचमध्ये आव्हान असेल. सनरायझर्सचा अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमारनं अपेक्षेप्रमाणे बॉलिंग केलेली नाही. त्याची कमतरता टी. नटराजन भरून काढतोय. यॉर्कर किंगनं आत्तापर्यंत या स्पर्धेतील 4 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या आहेत. हैदराबादकडून सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या नटराजनवर डेथ ओव्हर्समध्ये आंद्रे रसेलची फटकेबाजी रोखण्याचं काम असेल. वॉशिंग्टन सुंदरच्या अनुपस्थितीमध्ये टीममध्ये श्रेयस गोपाळचा समावेश होऊ शकतो. गुजरात टायटन्स विरूद्ध राहुल त्रिपाठी जखमी झाला असला तरी त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. हैदराबादच्या मिडल ऑर्डरमध्ये राहुल त्रिपाठी एडन मार्कराम आणि निकोलस पूरन हे बॅटर आहेत. सुनील नरीन आणि वरूण चक्रवर्ती या केकेआरच्या मिस्ट्री स्पिनर्सचा हे कसा सामना करणार यावर या मॅचचा निकाल अवलंबून आहे. IPL 2022 : ‘तर 10 खेळाडूंनाच खेळवा…’ टीम इंडियाच्या खेळाडूबाबत फॅन्सनी दिला सल्ला सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing 11 : केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्कराम, शशांक सिंह, श्रेयस गोपाळ, भुवनेश्वर कुमार, मार्को येनसन, उमरान अकमल आणि टी. नटराजन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022 , KKR , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात