मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) 5 पैकी 4 सामने जिंकून गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातनं गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) 37 रननं पराभव केला. गुजरातच्या या दमदार कामगिरीनंतरही त्यांच्या टीममधील एका खेळाडूवर क्रिकेट फॅन्स चांगलेच नाराज आहेत. गुजरातकडून खेळणारा टीम इंडियाचा ऑल राऊंडर विजय शंकर (Vijay Shankar) सातत्यानं फ्लॉप ठरतोय. राजस्थान रॉयल्स विरूद्ध त्याचा साई सुदर्शनच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेला शंकर फक्त 2 रन काढून आऊट झाला. यापूर्वीच्या मॅचमध्येही त्यानं 4 आणि 13 रन केले होते. सतत संधी मिळूनही अपयशी ठरत असलेल्या विजय शंकरवर फॅन्स चांगलेच नाराज आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ही नाराजी व्यक्त केलीय. विजय शंकरला खेळवण्याच्या ऐवजी 10 खेळाडूंसह खेळा असा सल्लाही फॅन्सनी गुजरात टायटन्सला दिला.
Me trying to understand how Vijay Shankar was picked by a franchise but not Raina 🙄#RRvGT #IPL2022 pic.twitter.com/7pTjnu6nrC
— Abdesh kumar (@Warrior_Poet_) April 14, 2022
Gujarat Titans replacing Vijay Shankar for Sai Sudarshan shows that they are happy with 10 players and give no damn about No.3 slot.#GTvRR @gujarat_titans @IPL #IPL
— Kalpesh Jain (@KalpeshJain45) April 14, 2022
Instead of playing vijay shankar Gujarat Titans can go with 10 players. No one is lucky enough to get so much opportunities other than Vijay shankar #RRvGT #vijayshankar #RRvsGT
— Don (@Donaldbren77) April 14, 2022
अर्थात, विजय शंकरच्या खराब कामगिरीचा फटका टीमला बसला नाही. या सामन्यात गुजरातनं पहिल्यांदा बॅटींग करताना 4 आऊट 192 रन केले होते. त्याला उत्तर देताना राजस्थानची टीम 9 आऊट 155 रनच करू शकली.. गुजरातकडून हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) सर्वात जास्त नाबाद 87 रन केले. त्यानं 52 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्स लगावले. अभिनव मनोहरनं 43 तर डेव्हिड मिलरनं 31 रनचं योगदान दिलं. लेफ्ट आर्म पेसर यश दयालनं 3 विकेट्स घेतल्या. IPL 2022, मोठी बातमी : हार्दिक पांड्यानं दिलं दुखापतीबाबत अपडेट, म्हणाला.. राजस्थानकडून जोस बटलरनं 24 बॉलमध्ये 54 रनची खेळी करत आक्रमक सुरूवात केली होती. बटलर आऊट झाल्यानंतर त्यांच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. कॅप्टन संजू सॅमसननं 11 तर शिमरॉन हेटमायरनं 29 रन केले.

)







