जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : संकटातील मुंबई इंडियन्ससाठी सचिनची बॅटींग, टीमला दिला खास मंत्र!

IPL 2022 : संकटातील मुंबई इंडियन्ससाठी सचिनची बॅटींग, टीमला दिला खास मंत्र!

IPL 2022 : संकटातील मुंबई इंडियन्ससाठी सचिनची बॅटींग, टीमला दिला खास मंत्र!

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंसाठी हा सर्वात खडतर कालखंड आहे. या कसोटीच्या कालखंडात त्यांचा धीर वाढवण्यासाठी टीमचा मेंटॉर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुढे आलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या 7 मॅच गमावणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही पहिलीच टीम ठरली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) गुरूवाारी 3 विकेट्सनं पराभूत केल्यानंतर मुंबईच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला या सिझनमध्ये अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. आता ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी उर्वरित सातही सामने जिंकणे आवश्यक असून इतर टीमच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी हा सर्वात खडतर कालखंड आहे. या कसोटीच्या कालखंडात त्यांचा धीर वाढवण्यासाठी टीमचा मेंटॉर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुढे आलाय. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये सचिननं या खडतर काळात एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला खेळाडूंना दिला आहे. ‘आपण सध्या खडतर कालखंडातून जात आहोत. या काळात आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि टीम म्हणून एकत्र पुढील वाटचाल केली पाहिजे,’ असा मंत्र सचिननं दिला आहे. मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनची (Ishan Kishan) पाठराखण केली असून ते आगामी सामन्यांमध्ये जोरदार कमबॅक करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या लढतीमध्ये हे दोघंही शून्यावर आऊट झाले होते.

जाहिरात

‘चढ उतार हे होत असतात. खरं सांगायचं तर इशाननं सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये अगदी चांगला खेळ केला, त्यानंतर त्याच्या खेळात घसरण झाली आहे. रोहितही चांगल्या पद्धतीनं बॉल हिट्स करत असून तो 15-20 रन सहज करत आहे. चांगल्या टचमध्ये असलेल्या रोहितला या सुरूवातीचं रूपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश येतंय. IPL 2022, RR vs DC Dream 11 Team Prediction : स्पिनर्सच्या लढाईत ‘या’ खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश या गोष्टी घडतात तेव्हा काहीही मनासारखं होत नाही, असं तुम्हाला वाटतं. मी एक बॅटर म्हणून हा सर्व अनुभव घेतला आहे. हा खेळाचा भाग आहे. त्या दोघांमध्ये कसलाही आत्मविश्वास नसता किंवा नेटमध्येही ते व्यवस्थित बॅटींग करू शकत नसतील तर कोच म्हणून मला काळजी वाटली असती,’ असे जयवर्धनेने यावेळी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात