Home /News /sport /

IPL 2022, RR vs DC Dream 11 Team Prediction : स्पिनर्सच्या लढाईत 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

IPL 2022, RR vs DC Dream 11 Team Prediction : स्पिनर्सच्या लढाईत 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

आयपीएल स्पर्धेतील 34 व्या लढतीत राजस्थान रॉयल्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी (Rajasthan Royals vs Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील 34 व्या लढतीत राजस्थान रॉयल्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी (Rajasthan Royals vs Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे. या मॅचमध्ये युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या स्पिनर्सचा सामना होणार आहे. या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट्स चहलच्या नावावर असून त्यानंतर कुलदीपचा नंबर आहे. दोन्ही टीमच्या यशात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर (Jos Buttler) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानं 6 मॅचमध्ये 375 रन केले आहेत. पण राजस्थानच्या मिडल ऑर्डरमध्ये शिमरॉन हेटमायरचा अपवाद वगळता एकाही सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. दिल्लीच्या बॉलिंगपुढे राजस्थानच्या मिडल ऑर्डरची परीक्षा होणार आहे. दुसरिकडं राजस्थान समोर फॉर्मातील डेव्हिड वॉर्नरला (David Warner) रोखण्याचं आव्हान असेल. वॉर्नरनं मागील तीन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. वॉर्नरला पृथ्वी शॉ चांगली साथ मिळतीय. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि खलील अहमद यांनी चांगली बॉलिंग करत ऋषभ पंतची काळजी कमी केली आहे. RR vs DC Dream 11 Team Prediction कॅप्टन - जोस बटलर व्हाईस कॅप्टन- डेव्हिड वॉर्नर विकेटकीपर- ऋषभ पंत बॅटर -पृथ्वी शॉ, जॉस बटलर, डेविड वॉर्नर, ऋषभ पंत ऑलराऊंडर: अक्षर पटेल, ललित यादव, शार्दुल ठाकुर बॉलर्स: कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, खलील अहमद, अश्विन हेब्बार, रिपल पटेल, यश ढूल, विकी ओत्सवाल, लुंगी एनगिडी, टीम सायफर्ट, प्रवीण दुबे, रोव्हमन पॉवेल, ललित यादव राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या