मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या कोचमुळे बदलली कृणालची बॉलिंग, 7 महिन्यांमध्ये दिसली जादू

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या कोचमुळे बदलली कृणालची बॉलिंग, 7 महिन्यांमध्ये दिसली जादू

लखनऊच्या या विजयात स्पिनर कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) मोठा वाटा होता. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

लखनऊच्या या विजयात स्पिनर कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) मोठा वाटा होता. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

लखनऊच्या या विजयात स्पिनर कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) मोठा वाटा होता. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) पंजाबवरील विजयाचं श्रेय बॉलर्सना दिलं. लखनऊच्या सर्वच बॉलर्सनी अचूक कामगिरी करत पंजाबला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 133 रनवर रोखलं आणि टीमला 20 रननं विजय मिळवून दिला. लखनऊच्या या विजयात स्पिनर कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) मोठा वाटा होता. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी कृणालला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार देण्यात आला.

कृणाल यापूर्वी मुंबई इंडियन्सकडं (Mumbai Indians) होता. त्याला या आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबईनं रिटेन केले नाही. आयपीएल ऑक्शनमध्ये लखनऊनं 8 कोटी 25 लाखांना खरेदी केले. बडोद्याच्या या ऑल राऊंडरनं या आयपीएल सिझनमध्ये 'पैसा वसूल' खेळ केला. त्यानं आत्तापर्यंत 9 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 6.18 आहे. कृणाल आता मुंबई इंडियन्स टीममध्ये नसला तरी त्याच्या यशात मुंबईच्या कोचिंग स्टाफमधील सदस्याचा मोठा वाटा आहे. स्वत: कृणालनंच मॅचनंतर हा खुलासा केला.

टीम इंडियाचा माजी स्पिनर आणि मुंबई इंडियन्सचे मॅनेजर राहुल संघवी (Rahul Sanghvi) यांचा या यशात मोठा वाटा आहे. कृणाल त्याच्या बॉलिंगबद्दल बोलताना म्हणाला की, 'गेल्या सात - आठ महिन्यांपासून मी बॉलिंगवर काम करत होतो. मला त्याचं आता फळ मिळत आहे. राहुल संघवी यांनी या काळात माझी मोठी मदत केली. मी बॅटींगमध्ये अजून काही खास करू शकलेलो नाही. मला आशा आहे की, आगामी काळात मी बॅटींगमध्येही चांगली कामगिरी करेल.

IPL 2022 : KL राहुलची कमाल, 7 फुट उंचीवर पकडला जिवलग मित्राचा कॅच! VIDEO

कोण आहेत संघवी?

राहुल संघवी माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 1998 ते 2001 या कालावधीमध्ये टीम इंडियाकडून 1 टेस्ट आणि 10 वन-डे इंटरनॅशनल खेळल्या. संघवी यांनी 95 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 271 तर 68 लिस्ट ए मॅचमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. ते मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचे दीर्घकाळापासून सदस्य असून सध्या टीमचे मॅनेजर आहेत.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Krunal Pandya, Lucknow Super Giants