Home /News /sport /

IPL 2022 : धोनीनं मान्य केली चूक, गुजरात विरूद्धच्या पराभवाचं सांगितलं कारण

IPL 2022 : धोनीनं मान्य केली चूक, गुजरात विरूद्धच्या पराभवाचं सांगितलं कारण

गुजरात टायटन्स विरूद्ध रविवारी झालेल्या लढतीत सीएसकेचा 7 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याची चूक मान्य केली आहे.

    मुंबई, 16 मे : चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) या आयपीएल सिझनमधील (IPL 2022) आव्हान संपुष्टात आलं आहे. शेवटचे काही सामने जिंकून शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्नही अपयशी ठरतोय. गुजरात टायटन्स विरूद्ध रविवारी झालेल्या लढतीत सीएसकेचा 7 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याची चूक मान्य केली आहे. धोनीनं मॅचनंतर सांगितलं की, 'पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय योग्य नव्हता. फर्स्ट हाफमध्ये फास्ट बॉलर्स विरूद्ध फटकेबाजी करणे सोपे नव्हते. स्पिनर्स विरूद्धही तशीच परिस्थिती होती. साई किशोरनं चांगली बॉलिंग केली. आम्ही शिवम दुबेला आधी पाठवू शकलो असतो. पण, त्यानं एन. जगदीशनला खेळवण्याचा उद्देश पूर्ण झाला नसता. आम्ही चांगली प्लेईंग 11 उतरवण्याचा प्रयत्न करू. आगामी मॅचमध्येही आम्ही काही बदल करणार आहोत.' आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्सला 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले आहे. यापूर्वी युएईमध्ये 2020 साली झालेल्या आयपीएलमध्ये सीएसकेला प्ले ऑफ गाठण्यात अपयश आले होते. एखाद्या आयपीएल सिझनमध्ये 9 सामने गमावण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ आहे. 2020 साली सीएसकेनं आठ सामने गमावले होते. IPL 2022 : गुजरात टायटन्सचा पहिला नंबर निश्चित, 5 टीमच्या आशा संपुष्टात गुजरात विरूद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या सीएसकेला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 133 रनच करता आले. विशेष म्हणजे सीएसकेला इनिंगच्या शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये एकही फोर लगावता आला नाही. त्यांनी या कालावधीत 24 रन देत 3 विकेट्स गमावल्या. गुजरातनं 19.1 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 134 रनचं लक्ष्य पूर्ण केले. गुजरातकडून ऋद्धिमान साहाने नाबाद अर्धशतक झळकावले. गुजरातचा हा 13 सामन्यांमधील 10 वा विजय आहे. या विजयानंतर पॉईंट टेबलमधील त्यांचा पहिला क्रमांक निश्चित झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Gujarat Titans, Ipl 2022

    पुढील बातम्या